मा. आ. वैभव पिचड मराठा समाजाला न्याय देणार का..?
अकोले ( प्रतिनिधी ) :-
आज महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मागत आहे, पात्रता असतांनाही आरक्षणामुळे मराठा समाज शिक्षण,नोकरी,राजकारण व इतर सर्व ठिकाणी मागे पडतांना दिसत आहे.सरकार कुणबीच्या दाखल्यावरून ओबीसी मधून आरक्षण देऊन वेळ मारू पाहत आहे तर दुसरीकडे ओबीसी समाज याला विरोध करतांना दिसत आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी असा संघर्ष उद्भवतांना दिसत आहे.संपूर्ण राज्यात गावोगावी आंदोलने करत मराठा समाज आक्रमक होतांना दिसत आहे अशावेळी अकोले नगरपंचायतची नगराध्यक्ष पदाची निवड होत आहे. अकोले नगरपंचायतमध्ये माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 12 नगरसेवकांचे बहुमत आहे. व त्यात 7 नगरसेवक मराठा समाजाचे आहेत तसेच नगरपंचायतमध्ये 17 पैकी 9 नगरसेवक मराठा समाजाचे आहेत. 9 ऑगस्ट आदिवासी क्रांतीदिनी तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.किरण लहामटे यांनी आमचा नाद करायचा नाही. असे वादग्रस्त वक्तव्य करून मराठा समाजाला डिवचले त्यामुळे त्याच्या या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणावर मराठा समाज दुखावला गेला. व डॉ. लहामटे यांच्यापासून मराठा समाज दूर लोटला गेला आहे. ती खदखद मराठा समाजातील तरुणांनी, जेष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन तालुक्यासमोर मांडली. अशा स्थितीमध्ये जर माजी आमदार यांनी नगराध्यक्ष पदाची संधी मराठा समाजातील उमेदवाराला दिली तर मराठा समाज नक्कीच त्यांच्याकडे आकर्षित होईल व त्याचे सकारात्मक परिमाण पुढे होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळतील. परंतु जर मराठा समाजाला डावलून त्यांच्या हक्काच्या जागेवर माजी आमदार वैभव पिचड यांनी दुसऱ्या उमेदवाराची नगराध्यक्षपदी निवड केली तर तालुक्यातील समस्त मराठा समाजाच्या नाराजीला पिचड यांना सामोरे जावे लागेल. कारण उद्या राखीव जागेचे आरक्षण निघाले तर मराठा समाजाच्या नगरसेवकांना त्याठिकाणी उमेदवारी करता येणार नाही. आज खुल्या प्रवर्गासाठी जागा आहे. तर त्याठिकाणी इतर समाजाच्या उमेदवारांना संधी देणे हा मराठा समाजावर अन्याय होईल व त्याचे नकारात्मक परिणाम आता पुढे होत असलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बघायला मिळतील. तरी माजी आमदार वैभव पिचड यांनी आलेल्या संधीचे सोने करून विद्यमान आमदार लहामटे यांच्या बेताल वक्तव्यामुळे मराठा समाज आज पूर्णपणे त्यांच्यावर नाराज होऊन त्यांच्यापासून दूर गेला आहे. याचा राजकीय फायदा करून उद्याच्या निवडणुकीत मराठा समाजाला आपलेसे करण्याची नामी संधी त्यांच्याकडे चालून आली आहे. आणि आलेल्या संधीचे त्यांनी सोने केले तर पुढील विधानसभा निवडणुकीत मराठा समाज वैभवराव पिचड यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल. पिचड यांच्या समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्याची ताकद या समाजामध्ये आहे. याची कल्पना त्यांना पण आहे. तरी ते मराठा समाजाचा अवमान करणार नाही. आणि नगराध्यक्षपदी मराठा समाजातील योग्य उमेदवाराला संधी देऊन समाजाचा गौरव करतील ही अपेक्षा मराठा समाजातील नागरिक बाळगून आहोत.