लॉंग मार्च मधील आंबेडकर वाद्यांनी जातीवादी पुढारी पासून सावध राहा : दादासाहेब ओव्हाळ

0

सातारा/अनिल वीर : बेडग, ता. मिरज येथील आंबेडकरवादी समाज गावाला असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान संबंधित लोकांनी पाडली. त्याच्या निषेधार्थ  निघालेला लॉन्ग मार्च हा करू नये. यासाठी गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस  यांनी ती कमान पूर्ववत करू.असा दिलेला शब्द न पाळल्यामुळे संबंधित लोकांचा बेडग आंबेडकरी अनुयायांचा पुनश्च लॉग मार्च सुरू झालेला आहे.त्या लॉंग मार्चला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक(भाऊ) निकाळजे यांच्या वतीने पूर्णतः समर्थन देत आहोत. वेळ प्रसंगी राज भवन घेराव घालून एकंदरच भाजपच्या व त्यांचे असणारे मित्रपक्ष हे जाणीवपूर्वक आंबेडकर विचाराच्या व महापुरुषांच्या विचारांच्या विरोधामध्ये सातत्याने काम करत आहेत.त्यामुळे अशा जातीवादी व कपटी सरकारच्या विरोधामध्ये जो लॉंग मार्च चालू आहे. तो लॉंग मार्च हा मंत्रालयावर न धडकता तो राजभवनावरती जावा. संबंधित निवेदन हे राज्यपाल यांना देण्यात यावे. ज्या गावाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची गरज नाही. ज्यांना बाबासाहेबांच्या नावाची ऍलर्जी आहे. जे बाबासाहेबांना नाकारत आहेत.त्यांचा आम्ही धिक्कार करत आहे. मग तेथील असणाऱ्या बेडक मधील सरपंच व त्याच्या पूर्ण बॉडीचा, जिल्हा प्रशासनाचा तसेच ना.सुरेश खाडे (पालकमंत्र्याचाही) आम्ही जाहीर निषेध करत आहोत.त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या सर्व सरकारातील सहभागी असणाऱ्या मित्र पक्षांचा ही आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहे. बेडगवासीय आंबेडकरी मिशन घेऊन जी सुरुवात केलेली आहे त्या तुमच्या मिशनला आमचा पूर्णता पाठिंबा आहे.परंतु आपल्यामधील विरोधातील खरा शत्रू कोण आहे ? हे ओळखण गरजेचे आहे. कारण, खरा शत्रू हा भाजप आणि त्याचे मित्र पक्ष असणारे सरकार आहे. त्यामुळे भाजपला सहकार्य करणारे आंबेडकरीवादीमधील काही दिखावू  नेत्यांच्या कार्यकर्त्यांपासून सुद्धा बेडग मधल्या आंबेडकरीवाद्यांनी सावध रहायला पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने लॉन्ग मार्च सार्थक ठरणार आहे. अशा प्रकारचे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, महाराष्ट्र प्रदेश संघटक कैलास भाऊ जोगदंड, महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत सर्वगोड,युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, जिल्हा सचिव किरण बगाडे, जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव,  जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पवार,तालुकाध्यक्ष मदन मदाळे, कराड तालुकाध्यक्ष मुकुंद माने,आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here