येवला प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या एक दिवस अगोदर राज्यात सर्वत्र एक तास स्वच्छतेसाठी अभियान राबविण्याचा नारा शासनाने दिला असली तरी andarsul अंदरसुल ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे 1 ऑक्टोबर रोजी गावातील रस्त्यावर भुमीगत गटारीचे पाणी साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या या रस्त्यालगत प्राथमिक आरोग्य केंद्र,अंगणवाडी,माध्यमिक शाळा,प्राथमिक शाळा असुन ग्रामपंचायत कार्यालय देखील हाकेच्या अंतरावर आहे तरी देखील स्वछतेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र बघावयास मिळत आहे भुमीगत गटारींच्या काही चेंबरला ढापेच नसल्याने अक्षरशः पाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आरोग्य कर्मचारी व रुग्णांना दुर्गंधीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
साचलेल्या गटारीच्या पाणी आरोग्य केंद्रात जमा झाल्याने रुग्णांची वाट बिकट बनली आहे दरम्यान स्वच्छता मिशनचे मोठमोठे फलक झलकवणाऱ्या ग्रामपंचायतचे गांवातील स्वच्छते कडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे गटारीच्या या दुर्गंधीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारे रुग्ण,विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट बनला आहे तर ग्रामपंचायत कार्यालया समोरील अंगणवाडी जवळील गटारीच्या चेंबरला ढापेच नसल्याने उघड्यावरील गटारीत वराहाच्या संचाराने अंगणवाडीतील बालक,सेविका,मदतनीस यांना देखील दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत अंगणवाडी सेविका सौ जाधव यांनी व्यक्त केली .
दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वच्छता रॅलीला देखील गटारीच्या पाण्यातुन मार्गक्रमण करावे लागण्याची नामुष्की ओढावली गेली ग्रामपंचायत प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थ करीत आहेत
प्रतिक्रिया ;
“अंदरसुल प्राथमिक आरोग्य केंद्राने रस्त्यावर साचत असलेल्या गटारीच्या पाण्याच्या संदर्भात अंदरसुल ग्रामपंचायतकडे कुठल्याही प्रकारचे लेखी पत्र दिलेले नाही”
भारत मोहिते,ग्रामविकास अधिकारी,अंदरसुल
“अंदरसुल प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रात साचत असलेल्या गटारीच्या पाणी समस्ये संदर्भात ग्रामपंचायतला वेळोवेळी कळविले आहे त्यावर ग्रामपंचायतीने कुठलीही उपाय योजना केली नाही सदर पाण्याचे व्हिडिओ तालुका वैद्यकीय अधिकारी यांना पाठविले आहे
जयश्री पवार,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अंदरसुल