टेलिफोन/आकडे

0

टेलिफोन .. Telephone

आठवती ते दिवस
रे मोबाईल नव्हता
एखादं दुस-या घरी
तो टेलिफोन होता

श्रीमंतीचे ते लक्षण
जिथे नांदते सुबत्ता
आकर्षण सर्वांसाठी
गाजवी सर्वत्र सत्ता

महद्आश्रर्य सकला
फोनवर त्या बोलता
अमृत वर्षावा न्हाहे
शब्द शब्द ते ऐकता

दूरून पहायची गोष्ट
लहान मुलां करिता
कृत कृत्यता कसली
फोन हातात धरता

गोंडस गोजिरे रुपडे
सन्मान भरभरु देता
अप्रुप वाटे कितीतर
रे फोन कुणाचा येता

मोबाईल आले अन्
टेलिफोन कट पत्ता
उरलायं शोभे पुरता
रे शोकेसमध्ये आत्ता

दिवसअसे एकेकाचे
सजीव निर्जीव कथा
नंतर सारेअडगळीत
प्रत्येका तीचं व्यथा

2
आकडे ..Accident figar

घडे काही दुर्घटना
चर्चाजिकडेतिकडे
प्रश्नांचा गोतावळा
रे धुराळा चोहीकडे

मेले किती जखमी
रूधीर मासाचे सडे
विदारक दृश्य सारे
पिळवटते रे आतडे

पंच नामा सरकारी
गेंड्याचे गूढ कातडे
लिहित राही कागदे
भरत जाती पोतडे

माहिती मोजूमापून
घट्ट आवळू दातडे
वरून येतो आदेश
लपवी खरे आकडे

मृत टाळूवरी लोणी
दिसू लागती रोकडे
विरोधक उभे समोर
नाचू लागती माकडे

ध्येय एक ते एकमेव
नेहमी बोला वाकडे
पोस्ट मार्टेम वारंवार
चिवडत रहा तुकडे

चर्चा गु-हाळ चालले
जळेना ओलीलाकडे
वै-यावरी प्रसंग नको
देवाला घाली साकडे

हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here