देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
मालेगाव येथे राहुरी तहसिलदार चंद्रजित राजपुत यांनी जून ते ऑक्टोंबर, २०२० मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात केलेल्या अनियमितता मुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले आहे. त्या संदर्भात विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यात दोषी आढळल्याने मालेगावचे तत्कालीन व राहुरीचे तहसिलदार चंद्रजित राजपुत यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आल्याचा आदेश शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांच्या सही काढण्यात आला आहे.
राहुरी तहसिलदार चंद्रजित राजपुत हे मालेगाव जि. नाशिक येथे तहसिलदार असताना जून ते ऑक्टोंबर, २०२० मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता केल्याचा त्यांच्या ठपका ठेवण्यात आला होता.विभागिय चौकशीत राजपुत दोषी आढळल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे चंद्रजित राजपुत यांच्याविरुध्द शासन ज्ञापन २० नोव्हेंबर २०२३ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ व १२ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन राहुरीचे तहसिलदार चंद्रजित राजपुत यांना तात्काळ शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे.निलंबन कालावधीत मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये.असे हि आदेश देण्यात आले आहे.