अहमदनगर – देवळाली प्रवरा येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक संपन्न या बैठकीमध्ये राहुरी फॅक्टरी येथील चैतन्य आल्हाट यांची युवा शहराध्यक्षपदी व भारत साळवे यांची शहर युवा उपाध्यक्षपदी तरमहासचिवपदी दत्तू भागवत तांदळे यांची निवड करण्यात आली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने या निवडी करण्यात आल्या. याप्रसंगी अनेक नवीन कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्षप्रवेश केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, देवळाली प्रवारा शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, जालिंदर घिगे, जिल्हा सचिव वर्षाताई बाचकर, सोमनाथ किर्तने, राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके, महासचिव अनिलराव जाधव, बाबासाहेब साठे यांच्यासह महाराष्ट्र केसरी पै. गुलाब आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पदाधिकारी चांगले काम करत असून, पक्षात चांगले काम करणारा पदाच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे. नियुक्त झालेल्या पदाधिकार्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत रहावे. तसेच पक्षाची ध्येय-धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन केले.