कोपरगाव : अयोध्येत सोमवारी रामलल्ला मंदिरात श्री राम प्रभुंची मुर्ती प्रतिष्ठापना होत असल्याने या मंगल दिनाचे पावित्र्य राखण्यासाठी रविवार आणि सोमवार दि. २२ रोजी कोपरगाव शहर आणि तालुका हद्दीतील सर्व मद्य तसेच मांस विक्री दुकाने, मासांहारी हाॅटेल, ढाबे बंद ठेवण्याचे आवाहन कोपरगाव नगर परिषद आणि तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
या बाबत कोपरगाव नगरपालिकेने परिपत्रक काढले असून यामध्ये नमूद केले आहे की, सोमवार दि. २२ रोजी श्री क्षेत्रअयोध्या येथील मंदिरात श्री राम प्रभुंची मुर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. हा उत्सव कोपरगाव परिसरातील विविध मंदिरात मोठ्या धार्मिक वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार असून याचे पावित्र्य राखण्यासाठी कोपरगाव शहर आणि तालुका परिसरातील सर्व मद्य विक्री दुकाने, मटन, चिकन, मासे विक्रीसह मांसाहारी खाद्यपदार्थ तसेच चायनीज पदार्थ विक्री, मासांहारी हॉटेल,ढाबे कोणत्याही परिस्थितीत चालू न ठेवता संपूर्ण दिवसभर बंद ठेवावीत. संबंधित मालक व विक्रेत्यांनी यांची नोंद घेऊन सूचनेचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन प्रश्सानाने केले आहे.