सातारा : शिक्षक जीवनभरच कार्यरत असतो.त्यांनी स्वतःचे आरोग्य व कुटुंब सांभाळून सामाजीक कार्य करावे.तेव्हा शिक्षक हा सेवानिवृत्त कधीच होत नसतो.असे प्रतिपादन केंद्रप्रमुख संजय सातपुते यांनी केले.
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वसंत यशवंत मोहिते (तुकाईवाडी) व मुख्याध्यापक भीमराव जानू भालेराव (वेणेगाव) यांनी अनुक्रमे ३९ व ३७ वर्षे सेवा पूर्ण केली आहे.त्यांच्या सेवापुर्ती सत्कार फत्त्यापुरचे केंद्रप्रमुख संजय सातपुते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.मोरया मल्टिपर्पज हॉल, लिंबाचीवाडी,ता.सातारा येथे आयोजीत करण्यात आलेल्या सोहळ्यात सातपुते मार्गदर्शन करीत होते.मंचावर बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,वरिष्ठ मुख्याध्यापक अभिजित भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, शिक्षक बँकेचे संचालक विशाल कणसे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, उदय भंडारे,माजी केंद्रप्रमुख पाटील,पोतदार, सूर्यकांत यादव आदींनी मनोगत व्यक्त केली.
राजश्री जाधव व सुषमा राजे यांनी सूत्रसंचालन केले.पृथ्वीराज निकम यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास ज्येष्ट सामाजीक नेते एकनाथ भालेराव, शिवाजी जाधव (पुणे), माजी सरपंच संगीताताई वाघमारे (शेंद्रे) व दगडू मोहिते(कोचरेवाडी), सुमित्रा माने,माजी सरपंच संजय पवार(तुकाईवाडी),सुरेश भालेराव,रवींद्र भालेराव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश घोडके (तुकाईवाडी) व राणी बोबडे (वेणेगाव), मुंबईचे भीमराव तांबे, शामराव भालेराव, सागर भालेराव व दयानंद तांबे, युवा उद्योजक सूरज भिलारे (भिलार), ऍड.तुषार नामदास, रामचंद्र भालेराव, ऍड.विलास वहागावकर, शांताराम भालेराव, केतन भालेराव,उपसरपंच नंदा मोहिते, सौ.राजश्री जाधव,सौ. काटवटे, सौ.सुजाता घोरपडे, सतीश यादव,सुरेखा जाधव, लक्ष्मण जंगम,अंकुश जाधव, सतीश जाधव,संध्या पोतदार, दगडू पवार,हिंदुराव पाटील, अधिकरव जाधव, नानासाहेब जाधव, अशोक पाटील,प्रभाकर मोरे, महेश वाडते,ज्ञानेश पवार, पृथ्वीराज निकम, दीपक पवार, साळवे, यादव,भस्मे, चव्हाण, पोतदार मॅडम,अनिल यादव, चंद्रकांत मोरे,सतीश यादव आदी परिसरातील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. याकामी,फत्यापुर समूह साधन केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद,शाळा व्यवस्थापन समिती तुकाईवाडी व वेणेगाव यांनी अथक असे परिश्रम घेतले.