कामगार…(भिम)

0

सदोदित  येत राहते

बाबासाहेब आठवण

कामगारा दिले किती

गच्च  भरी  साठवण…

संघटीत हो कामगार

योग्य वेळी आंदोलन

केलेले उचीत कानून

आम्ही  सुखी म्हणून…

माल्यार्पण करी तुज

उपकार  तव जाणून 

लिंग भेद मुळी नको

सकला  समान वेतन…

बायांना प्रसुती  रजा

बदलले तया  प्राक्तन

देई हक्क  बरोबरीचा

घडवे सार्थ  परिवर्तन… 

सेवा योजना संस्थान

उघडले  छान  दालन

बेकारां  देई  रोजगार 

दिल्या शब्दाचे पालन…

औद्योगिक परिषदही

भिमाने केली स्थापन

चळवळी दिशादर्शक 

दे प्रक्षिक्षणअध्यापन…

अन्याय विरोधी लढा

सुरू  केल्या  युनियन

योग्य मोबदला  घामा

तुज मुळे सार्थ  सपन…

जगतोयं सुखी जीवन

रोजगार मिळे  साधन

महा मानवा  धन्यवाद

तुज  करी अभिवादन …

– हेमंत मुसरीफ पुणे .

  9730306996

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here