करे सकल स्वागत
महाराष्ट्र दिल दार
उजळे भाग्य किती
खुलले संधीचे दार…
संकट येई कुणावर
देतो सक्षम आधार
संताची पवित्रभूमी
स्नेहाची सदैव धार…
घामाचे घडवे मोती
भूमी अति कसदार
विफल न करेकुणा
फळे सुहृद रसदार…
भिमराव पुत्र जणूं
कष्ट करी कामगार
उद्रेक ना अतिताई
जरी होतो एल्गार…
कर्वे सावित्री भुमी
शिक्षणावरी मदार
अमोल रत्ने दिली
साहित्य बहारदार…
घडवण्या कलाकार
बाॅलीवूड असरदार
लोकनाट्य तमाशा
विविधांगि किरदार…
कायदे सक्षमपाठी
तलवारी धार धार
उद्योग व्यवसायास
धोरणे सारी उदार…
इथले होऊन रहावे
कर्मयोग इमानदार
देणार सुछत्र चामर
रे महाराष्ट्र दिलदार…
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..