उरण तालुका दैनिक पत्रकार संघाचे वाहतूक कोंडी बाबत धरणे आंदोलन स्थगित

0

उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )

उरण शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी उरण तालुका दैनिक पत्रकार संघाने गुरुवारी २९ ऑगस्ट पासून उरण तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा  इशारा उरण नगरपरिषद व उरण वाहतूक शाखेला निवेदनातून दिला होता. मात्र उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव आणि उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी त्यांच्या संबंधित  प्रशासनाची  बैठक  बोलावून, उरण तालुका दैनिक पत्रकार संघाने, निवेदनातून मांडलेल्या, उरण शहराच्या वाहतूक कोंडीच्या व इतर महत्त्वाच्या समस्या जाणून घेतल्या. 

याशिवाय पत्रकारांच्या मागणीनुसार या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे नियोजित धरणे आंदोलन संबंधित पत्रकारांनी स्थगित करावे असे उरण नगरपरिषदेने उरण तालुका दैनिक पत्रकार संघाला २८ ऑगस्ट रोजी,दिलेल्या पत्राद्वारे कळविले आहे. दरम्यान उरणकरांच्या वाहतूक कोंडीच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाविषयी संबंधित प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील.  त्यासाठी नगरपरिषदेकडून अतिक्रमण नियंत्रण पथक गठीत करण्यात आले असून, त्यांच्याकडून वेळोवेळी आवश्यक कारवाई सुरू आहे. वाहतूक कोंडीची समस्या व शहरातील नागरिकांच्या इतर समस्या  लवकरच मागणी मार्गी लागतील. असे संघाला दिलेल्या लेखी पत्रातून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here