मुलगी पळवून नेल्याच्या करणातून दोन गटात धुमचक्री 

0

दगडफेक केल्याने किराणा दुकानासह मोटारसायकलचे नुकसान,तीन जण गंभीर जखमी 

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

               राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शनिवारी सायंकाळी दोन गटात धुमचक्री झाली.परस्परांविरोधात दाखल केलेल्या फिर्यादीत १२ जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही गटातील तीन जण गंभिर जखमी झाले आहेत. एका गटा विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.दोन्ही एका गटाने दगडफेक करीत किराणा दुकानाचे  व एका मोटारसायकलचे नुकसान केले आहे.

           

याबाबत पोलिस सुञाकडून समजलेली माहिती अशी की,निखिल दिलीप धोञे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,प्रशांत संजय म्हस्के, बाबासाहेब बाळु पवार,अजय धोत्रे व विजय इथापे हे सर्व एकञ जमुन तुम्ही जास्त माजलात का, आमच्या भाचीला पळवुन नेता व रुतीक धोञेला मदत करता काय? असे म्हणत शिवीगाळ करुन राहुल इंगवले याने प्रशांत म्हस्के याचे डोक्यात लोखंडी रॉडने व दगडाने तसेच अजय इंगवले याने बाबासाहेब पवार याचे डोक्यात लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करुन गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला,फिर्यादी व सुनिता म्हस्के असे सोडवासोडव करत असतांना आरोपी लक्ष्मण म्हस्के, विकी म्हस्के, दिपक इंगवले, शुभम चव्हाण यांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन आरोपी लक्ष्मण म्हस्के याने फिर्यादीचे डाव्या पायावर लाकडी दांड्याने मारहान करुन दुखापत करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.फिर्यादी वरुन सहा जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करीत आहेत.

               

दुसरी फिर्याद विकी अशोक म्हस्के याने दिली असुन फिर्यादीत म्हटले आहे की, जातीवाचक शिवीगाळ करून आमच्यावर केस करता का? त्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे. असे म्हणत विकी म्हस्के याच्यासह इतरांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. प्रशांत म्हस्के याने काहीतरी टणक वस्तुने विकी म्हस्के  कपाळावर तोंडावर, खांद्यावर मारहाण केली आहे. तसेच चुलते लक्ष्मण म्हस्के यांच्या मोटरसायकलवर दगड मारुन तिचे नुकनास करुन तुम्ही केस माघे घ्या नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली आहे. या भांडणात विकी म्हस्के याची मावशी अलका चव्हाण व सुमन येटाळे यांचे गळ्यातील मंगळसुत्र तुटुन गहाळ झाले आहे. फिर्यादी वरुन बाबासाहेब पवार उर्फ रोंग्या,प्रशांत म्हस्के उर्फ परशा,निखील दिलीप धोत्रे,विजय बाळु इथापे उर्फ खंड्या,अनिल बाळु इरले उर्फ खली,आंबादास इरले उर्फ काळु सर्व रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी जि. अहिल्यानगर या सहा जणा विरोधात जातीवाचक शिवीगाळ व विविध कलमान्वये   गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलिस उपअधिक्षक शिरीष वमणे हे करीत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here