राहुरी फँक्टरी येथील इंग्रजी माध्यम शाळेचा प्रताप
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
शिक्षण विभागातील लाडाचे अधिकारी व इतर विभागातील प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित वार्षिक स्नेहसंमेलनचा शुभारंभ करण्यात आला.मान सन्मान घेवून गेले.मान पानाच्या खर्चा भार माञ विद्यार्थ्यावर टाकण्यात आला.हा खर्च वार्षिक स्नेहसंमेलनातुन वसुल करण्याचे नियोजन प्राचार्यांनी आखले. वार्षिक संमेलनात भाग न घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वसुल करण्याचे ठरविले. स्नेहसंमेलनाची वर्गणी ज्या विद्यार्थ्यांनी जमा केली नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशीच परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतला. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना चक्क परीक्षाच्या वर्गा बाहेर बसवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार राहुरी फँक्टरी येथिल एका इंग्रजी शाळेत घडला असून काही सुज्ञ पालकांनी या शाळेच्या प्राचार्याला धारेवर धरल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आला.
इंग्रजी माध्यमाची शाळा काहीना काही कारणाने कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहते.या शाळेत मागील काही वर्षांपूर्वी याच शाळेत एका धर्माचा व जातीच्या विद्यार्थ्याच्या अनादर केला म्हणून उपप्राचार्यवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व पोलिस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यांनी संबधित उपप्राचार्यास अटक केली होती.यावेळी देखिल याच शाळेत नुकत्याच झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्याकडून ठरावीक रक्कम जमा करण्याचे आदेश शाळेच्या व्यवस्थापनाने दिले होते.ज्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात भाग घेतला त्यांनी वर्गणी रुपाने ठराविक रक्कम शाळेकडे जमा केली.परंतू ज्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात भागच घेतला नाही.त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी वर्गणी देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.शाळा व्यवस्थापन मंडळाने ज्या विद्यार्थ्यांनी वर्गणी दिली नाही.त्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी परीक्षा वर्ग खोलीत प्रवेश नाकारुन विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसविले.हि माहिती पालकांना समजताच पालकांनी शाळा गाठून प्राचार्यास चांगलेच धारेवर धरत आम्ही वर्षभर विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरतो स्नेहसंमेलनात भाग न घेता ती वर्गणी आम्ही का द्यायची. काही पालकांनी वार्षिक स्नेहसंमेलनाची वर्गणी भरतो पण आम्हाला त्याची पावती द्या,विद्यार्थ्यांना परीक्षेपासूनच वंचित ठेवून बाहेर बसवू ठेवू नका.परंतु या उर्मट असलेल्या प्राचार्यांनी पालकांना देखील उडवा उडवीची उत्तर देत स्नेहसंमेलनाची फी भराच तरच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसून देईल असा पावित्रा घेतला.त्यामुळे वातावरण अधिकच तापत गेल्याने या वादावर पडदा पाडून विद्यार्थ्यांना परिक्षेस बसण्यासाठी अनुमती दिली. दरम्यान काही पालकांनी प्राचार्यावर कारवाई व्हावी अशी मागणी लावून धरली.
चौकट
■ शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची लाडकी शाळा ?
राहुरी फॅक्टरीतील येथिल इंग्रजी माध्यमाच्या शाळेबाबत अनेक तक्रारी कायम ऐकावयास मिळत आहे.कधी विद्यार्थ्यांना त्रास तर कधी पालकांची आर्थिंक पिळवणूक तर कर्मचाऱ्यांचे शोषण केले जाते.यासंदर्भांत पालकांनी व कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र राहुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने कायम कानाडोळा केला आहे.शिक्षणाधिकाऱ्यांना या शाळेत होणाऱ्या कार्यक्रमात कायम मानपान मिळत असल्याने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची लाडकी शाळा असल्याची चर्चा पालक वर्गातून होत आहे. त्यामुळे कुठलीही कारवाई होत नसल्याचे पालकांनी बोलताना सांगितले आहे. राहुरीचे शिक्षण विभागातील अधिकारी काय कारवाई करतात याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
■ मान सन्मान त्यांचा खर्च मात्र विद्यार्थ्यांचा?
राहुरी फँक्टरी येथिल इंग्रजी माध्यमाच्या शाळेने विद्यार्थ्यांचे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन घेतले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिक्षण विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. आलेल्या अधिकाऱ्यांचा मान सन्मान महागाडी भेट वस्तु देवून करण्यात आला. त्यामुळेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची लाडकी शाळा आहे.या मान सन्मानाचा खर्च शाळेने करण्या ऐवजी विद्यार्थ्यांकडून वार्षिक स्नेहसंमेलन वर्गणी रुपाने वसुल करणे शाळा व्यवस्थापन समितीने चुकीचे काम केले आहे.
अरविंद ढुस, पालक