सोनेवाडी शाळेच्या शताब्दी वर्षाच्या आमंत्रण स्वीकारले
पोहेगांव (प्रतिनिधी) : गावातील जिल्हा परिषदेत शाळा व त्या शाळेत शिकवणारे शिक्षक यांची पालकांशी बांधिलकी असते. आपला विद्यार्थी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी कसा करेल याकडे शिक्षक लक्ष देतात. सोनेवाडी जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा असून विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर मजल मारली आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी आज उच्च स्थानी असून या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते असे प्रतिपादन इंडस्ट्रीज मध्ये डिझाईन व इंडस्ट्री उभारणीचे मराठी उद्योजक अशोकराव जाधव यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
शाळेला पुढच्या वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देखील शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांकडून त्यांनी स्वीकारले आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण जावळे, माजी सरपंच व्यंकटराव जावळे, शिवसेना तालुका उपाध्यक्ष कर्ना जावळे, सोनेवाडी पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक जावळे,बबलु जावळे, शाळेचे शिक्षक चंद्रविलास गव्हाणे, सुरेश धनगर, मनोहर वहाडणे, अनिल पराड, कविता पानसरे अदी उपस्थित होते.
लोकसभागातून सुरू असलेल्या कामांची पाहणी जाधव यांनी केली. शाळा रंग रंगोटी, वृक्षारोपण, महापुरुषांचे फोटो डिझाईन, स्वच्छ आरो सिस्टम, शौचालय, सीसीटीव्ही कॅमेरा परिसर अदी सुविधा शाळेत असल्याने त्यांनी कौतुक केले. शाळेत विज्ञान अभ्यास वर्ग, कॅम्पुटर, प्रत्येक वर्गात डिजिटल टीव्ही यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ऊर्जा मिळत असल्याचे शाळेचे शिक्षक चंद्रविलास गव्हाणे यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जाधव यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्याने ते भारावून गेले. शेवटी आभार मनोहर वहाडणे यांनी मानले.