सातारा : विश्वरत्न कला मंचतर्फे नुने,ता.सातारा येथे बुधवार दि. १९ रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर सकाळी ११ वा बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव होणार आहे.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, सरपंच सौ.जयश्री संतोष मोरे व सामाजिक कार्यकर्ते दयानंद अशोक नागटिळक उपस्थीत राहणार आहेत.तेव्हा समाजातील सर्व घटकांनी वेळेवर उपस्थीत रहावे. असे आवाहन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अध्यक्ष महादेव मोरे यांनी आवाहन केले.तेव्हा शाहिर किरण जगताप, संतोष मोरे,दिलीप कांबळे आदींनी उपस्थितांना निमंत्रण पत्रिकाचे वाटप केले. प्रथमतः डॉ. आंबेडकर पूतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भन्ते दिंपकर (थेरो) यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पाडला. यावेळी शाहिर श्रीरंग रणदिवे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले.यावेळी प्रा.श्याम मानव प्रणित अंनिसचे प. महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष डॉ.विलास खंडाईत,ज्येष्ट नागरीक संघाचे बी.एल.माने, संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे,वसंत गंगावणे, धम्मबांधव उत्सव कमिटीचे कोषाध्यक्ष विकास तोडकर, जिल्हा भारतीय बौध्द महासभेचे सचिव दिलीप फणसे व नंदकुमार काळे तसेच पदाधिकारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर व माणिक आढाव,कार्याध्यक्ष अनिल वीर,पदाधिकारी व सदस्य, चंद्रकांत जीवने,डी.एस.भोसले, अशोक भोसले,एकनाथ तेलतुंबडे,अंकुश धाइंजे, आत्माराम घोस्के,सुखदेव घोडके,गणेश कारंडे,प्रणव घोडके,उत्तम पोळ,नागटीळक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या समख्येनी उपस्थीत होते.