बजेटला मार्क किती
नेहमीचे तेचं सवाल
तीचंभाषणे साचेबंद
कायमचा तो बवाल
सत्ताधारी म्हणतात
खरीचं केली कमाल
सुखी अखील जनता
राजा असो वा हमाल
न भुतो ना भविष्यति
बजेट भारी बेमिसाल
बडवा आपले नगारे
हेचि चाले सालोसाल
विरोधी टिकाकाराची
तीचं तसलीचं धमाल
वास येतो कुजल्याचा
नाकाला लाव रूमाल
भिक्कार टुकार बजेट
शिव्याकराव्या बहाल
शून्यमार्क देऊ आम्ही
गरीबांचे झाले बेहाल
कोषाबाहेर पडून अरे
सांगा कधी बदलाल
किती दिवस रडगाणे
आमचीचं बाबा लाल
भरवसा ..
अनन्यअसते महत्व
अर्थ संकल्प दिवसा
काय आहे पोतडीत
काही नाही भरवसा
हळदी कुंकू सुसंपन्न
मंत्रीबाईचे वाणवसा
उतू नका मातू नका
टाकू नका घेता वसा
महागाई गं सोसवेना
ओरडूनि सांगते घसा
अ प्रत्यक्ष कर सगळे
वाढू लागे भसाभसा
त्रासला मध्यमवर्गीय
शांत केला कसाबसा
खूपवर्षांनी दिले लक्ष
किती रडे आता हसा
ज्वालाग्रही इंधनाच्या
झळा चूप चाप सोसा
तरुणाई तृप्त जराशी
योजनांचा देई झासा
आकर्षे उसळते रक्त
बरोबर पाडला फासा
प्रश्नाकिंत चेहरेविचारे
रुपया आणालं कसा
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.