स्वाती लोंढे यांचा अमृतवेल परिवाराकडून विशेष सन्मान
दौड-रावणगाव, परशुराम निखळे : अमृतवेल मीडीया समूह यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “अमृतवेल गव्हर्नन्स” या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा पुण्यातील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून नेहा देशपांडे सहआयुक्त आयकर विभाग या उपस्थित होत्या.अमृतवेल गव्हर्नन्स विशेषांकाचे प्रकाशन नेहा देशपांडे व चंद्रकात दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या अंकांमध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या महिला अधिकार्यांची यशोगाथा मांडली आहे,जेणेकरून पुढील पिढीला त्यांचा आदर्श घेता येईल,अशी माहिती अमृतवेलचे संपादक धर्मेंद्र पवार यांनी दिली.
पुढील रणरागिनींचा कार्याचा लेखाजोखा या अंकांत घेण्यात आला आहे-
१)नेहा देशपांडे,सहआयुक्त आयकर विभाग,पुणे २)तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सांगली ३) वैशाली आवटे मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण,पुणे ४)डाॅ.अर्चना पठारे उपजिल्हाधिकारी,एमआयडीसी पुणे ५)अश्विनी राख सहायक पोलिस आयुक्त पुणे ६)डाॅ.आसावरी संसारे-रेवडेकर तहसीलदार,ठाणे ७)विद्या पोळ उपायुक्त,मनपा ८)लीना ओव्हळ उपअधीक्षक,भूमीअभिलेख पुणे ९)स्वाती लोंढे-चव्हाण ग्रामविकास अधिकारी,दौंड,पुणे १०)डाॅ.वैशाली वाघमोडे मंडळ अधिकारी,कवठेमहांकाळ
यावेळी रयत शिक्षण संस्थेतील स्पर्धा मार्गदर्शन केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार अमृतवेल परिवाराकडून करण्यात आला. ग्रामीण भागातील कार्याबद्दल स्वाती लोंढे यांचा गौरव ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी, तसेच उपक्रमशील कार्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे यांचा सन्मान नेहा देशपांडे(मूळच्या इंदापूरच्या)आयकर सहआयुक्त यांच्या हस्ते करण्यात आला.