साडेतीन मुहूर्ताला
उभी करायची गुढी
सुशोभित काठीला
नेसवा चोळी साडी…
गळ्यामध्ये हार तुरे
घाल साखरेची लडी
भरभरुन आशीर्वाद
सुखीसंसाराची घडी…
जेऊ घालू भुकेल्या
येईल पूर्णान्नां गोडी
नव संवत्सर आरंभ
माणूस माणसे जोडी…
आयुर्वेद सत्व सांगते
गोड कडूलिंब काडी
पर्यावरण महत्वाचे
जपावी झुडपे झाडी…
प्रभु रामाचे जयघोषे
नवीन दालने उघडी
झाले गेले गंगे मिळे
विसरू मनाची अढी…
वसंतोत्सव स्वागता
आनंद ओसंड दुधडी
सुती कपडे हलकेसे
बाजूला सारा गोधडी…
सांस्कृतिकप्राकृतिक
नैसर्गिक पाडवा गुढी
महत्व सत्व वैज्ञानिक
जाणून घ्यायची घडी…
नवा पाडवा ..
चैत्रशुद्ध ही प्रतिपदा
सण आनंद पाडवा
शालिवाहन संवत्सर
प्रथम सुदिन हा नवा…
अयोध्येत प्रभु आले
वधुनि रावण दानवा
वनवास प्रजेचा सरो
राजा लाभे जो हवा…
भूमीच्या गर्भाशयात
बीज पेरी सूर्य देवा
सर्जनाला मिळे उर्जा
शेतकरी सुखी व्हावा…
मीठ हिंग मिरी ओवा
कडुनिंबा सह खावा
तन मन तंदुरुस्त हो
आजार लांब पळावा…
अंतर्बाह्य निरामय हो
वसंतोत्सव स्फुरावा
उभारा पताका गुढी
नात्यात नको दुरावा…
पिवळी पाने गळणार
रे निसर्ग शालू हिरवा
जीवन चक्र ओळखा
औदासिन्याला हरवा…
पुराण ते नवीन युगा
बदलत गेला पाडवा
तरीही तसाचं अखंड
राहिलाअवीट गोडवा…
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..