खर्ड्याचा निरज पवार आयआरडीए परीक्षेत उत्तीर्ण 

0

जामखेड तालुका प्रतिनिधी – भारत सरकार मान्यता प्राप्त इन्शुरन्स क्षेत्रातील आय आर डी ए आय अंतर्गत परीक्षेत खर्ड्याचे नीरज पवार उत्तम गुणासहित उत्तीर्ण नामांकित टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीत पात्र

याबाबत माहिती अशी की,खर्डा येथील निरज पवार याने भारत सरकार मान्यता असलेल्या आयआरडीए  पुणे येथे झालेल्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून त्यांना टाटा  एआईए लाइफ इन्शुरन्स कंपनीत काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, तसेच त्याबरोबर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी  या माध्यमातून त्यांना काम करता येणार आहे. टाटा सारख्या नामांकित कंपनीच्या इन्शुरन्स क्षेत्रामध्ये पवार यांना काम करण्याची संधी मिळाली असून त्याच्या या यशाबद्दल खर्डा व जामखेड तालुक्यातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

ते टाटा  एआईए लाइफ इन्शुरन्स कंपनीत काम कंपनीच्या ट्रेनिंग साठी पुण्याला जाणार असून त्यातून त्यांना इन्शुरन्स क्षेत्रा मध्ये काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दत्तराज पवार यांचे चिरंजीव आहेत.  या संदर्भात नीरज पवार यांना चाकण येथील युवा उद्योजक  हिंदुस्थान ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा व टाटा इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ व्यावसायिक सहकारी संजय राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. नीरज पवार याचा या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here