कोपरगाव प्रतिनिधी ;- साई गाव पालखी सोहळ्याचे निमित्ताने व गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबादेवी तरुण मंडळ, जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समिती व शारदा संगीत विद्यालयाच्या वतीने भक्तीगीत, भावगीत, देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर नगरी येथे संपन्न झाला.
त्याप्रसंगी सहकारमहर्षी माजीमंत्री कै शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, सौ. रेणुका ताई कोल्हे, पतसंस्था फेडरेशनचे काका कोयटे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे, उद्योजक कैलास शेठ ठोळे, मंचच्या अध्यक्षा सौ सुधाभाभी ठोळे, रजनीताई गुजराथी, कार्याध्यक्ष विजय बंब, ऊत्तम भाई शहा डॉ विलास आचारी, चार्टर्ड अकौंटंट नितीन डोंगरे, शांताराम केकाण आणि शहरातील संगीतप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.