उपवासाचा महिना
पवित्रअसे रमजान
पाप कर्मे दूर जाती
शुध्दतेकडे रूझान…
भूक लागता कळते
किंमती किती जान
अन्न दान भुकेल्या
भलो असो अंजान…
अल्लाह याद सदा
साद घालते अजान
सर्वं श्रेष्ठ धर्मामध्ये
भाईचारा भाईजान…
नमाजपठण करता
साफ होईल जुबान
खुश राहो धरती ही
पशू पक्षी बेजुबान…
ईद मुबारक बोला
सर्व जाती सन्मान
गळाभेट देई सर्वां
माणूस एक समान…
एक थाळी इफ्तार
क्षीर कुर्मा रसपान
अंतर्बाह्य सात्विक
सण असा रे महान…
हजयात्रा घडो मज
एकदातरी रे निदान
इबादत जमेल तशी
माणूस मी रे नादान…
रमजान ...
उपवासाचा महिना
रमजान असे पवित्र
तन मन दोन्ही शुद्ध
साजे ईद उल फित्र
नसावी मनी दुश्मनी
बनवा सकला मित्र
भाईचारा भाई जान
बदलूनि टाकी चित्र
चादर पाघरां गरीबा
अल्लाह देईल छत्र
भुकेल्या देता घास
इबादत होईलं पात्र
मोहम्मदाच्या कृपेने
पाक पावन चरित्र
दान धर्म सदैव करी
सुरु होई नवीन सत्र
आमीन बोले प्रेषीत
अल्लाकी दुवा पात्र
ईदचंद्राची शीतलता
सुखे मोहरे गात्रगात्र
इबादत आली फळा
बदलले जीवन सुत्र
क्षीर कुर्मा वाटताना
खुप मिळाले सन्मित्र
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996