संत साहित्य विषयक ग्रंथाची गुढी उभारून पहिल्यांदाच अनोखा उपक्रम उत्साहात !

0

अनिल वीर सातारा : येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय ये थे गुढी पाडव्यानिमित्त संत साहित्य विषयक ग्रंथांची  गुढी उभा करण्यात आली.पहिल्यांदाच अनोखा असा उपक्रम राबविण्यात आला.

               नवीन वर्षाचा शुभारंभ होताना संत साहित्याचे विचार माणसाच्या जगण्याला प्रेरक आणि प्रेरणा देणारे ठरतील. त्यासाठी ग्रंथांचे वाचन महत्त्वाचे आहे.नगर वाचनालयात विविध प्रकारचे जवळपास दीड लाख ग्रंथ उपलब्ध आहेत.

ज्या वाचकाला ज्या पद्धतीचे साहित्य आवडेल ते साहित्य त्याला वाचण्यास उपलब्ध करून दिले जाते.माणसाला समृद्ध आणि सजग बनायचे असेल तर ग्रंथ वाचन हे महत्त्वाचे आहे. हे सांगण्याच्या उद्देशातून ही ग्रंथांची गुढी वाचनालयात उभी केली आहे.असे मत ज्येष्ट साहित्यिक डॉ.राजेंद्र माने यांनी व्यक्त केले.

    यावेळी गुढीचे पूजन करण्यात आले.कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सदरच्या कार्यक्रमास डॉ. जोत्स्ना कोल्हटकर,डॉ.श्याम बडवे,डॉ. संदीप श्रोत्री, विजयकुमार क्षीरसागर,अनिल वीर,प्रा.श्रीधर साळुंखे ,गौतम भोसले,आनंदा ननावरे,वसंत चिकोडे, किर्लोस्कर, ग्रंथपाल रुपाली मुळ्ये,अन्वेषा,विष्णू धावडे, भाग्यश्री शिंदे,वेदांत किरवे, विजय दळवी व वाचकवर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here