पांडुरंग माने यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी
जामखेड तालुका प्रतिनिधी
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत. कुशल प्रशासक व आदर्श न्याय पद्धतीच्या जोरावर त्यांनी रयतेच्या जगण्याचा खऱ्या अर्थाने राम आणला. शासनाच्या विविध कार्यक्रमातही आहिल्यादेवी नावाचा उल्लेख आहे मात्र महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात आहिल्याबाई असे नाव झाले आहे त्यामुळे येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असा उल्लेख करण्याची मागणी महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य पांडुरंग माने यांनी केली आहे
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, हिंदुस्तान परकिय राजवटीमुळे शंत खंडित झाला होता. त्यास अखंडित ठेवण्याचा काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. या खंडप्राय देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर त्यांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली व शेकडो मंदिरे जनार्धन जीर्णोद्धार केला व हिंदू संस्कृतीला पुनर्जीवित करत भारत भूमीला आत्मसन्मान मिळवून दिला.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानला नवी दिशा दिली. देशाला अखंडित ठेवले.अशा या महान प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे महान व प्रेरणादायी आहे. शासनाच्या विविध कार्यक्रमातही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असा उल्लेख करण्यात येतो.
मात्र शालेय अभ्यासक्रमात आहिल्याबाई असा उल्लेख करण्यात आला होता,त्यामुळे येणाऱ्या शालेय सत्रातील अभ्यासक्रमात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असा उल्लेख करण्याची मागणी महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य पांडुरंग माने यांनी केली आहे यावेळी ओबीसी समाज संघटनेचे उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, दशरथ कोळेकर, पप्पू काशिद आदींसह धनगर समाज बांधव उपस्थित होते