यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे गंभीर अन्ननलिका कॅन्सरवर उपचार

0

सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांच्या प्रयत्नांना यश ः एसोफेजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा च्या रुग्णास जिवनदान

नांदेड – प्रतिनिधी

एसोफेजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणजेच अन्ननलिकेच्या कॅन्सरने ग्रस्त तत्कालीन वय ३५ वर्षे असलेल्या रुग्ण उपेंद्र विष्णुपुरीकर यांच्यावर यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथील सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांनी तब्बल १३ वर्षापूर्वी यशस्वी एसोफेजेक्टॉमी. शस्त्रक्रियेव्दारे अन्ननलिकेचा सर्व किंवा काही भाग, पोटाचा काही भाग आणि जवळील लिम्फ नोड्स काढून टाकत रुग्णाच्या आतड्यापासून नवीन अन्ननलिका तयार करून जिवनदान दिले होते व तो रुग्ण आज तब्बल १३ वर्षा नंतर ठणठणीत आयुष्य जगत आहे अशी माहीती  हॉटेल चंद्रलोक येथील आयोजित पत्रकार परिषेदेत डॉ.सचिन मर्दा व रुग्ण श्री उपेंद्र यांनी दिली  

यावेळी त्यांनी सांगितले की, सदरील रुग्णांस एसोफेजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा या दुर्मिळ अन्ननलिका कॅन्सरने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी गाठले होते त्यास अन्न गिळतांना पाणी पितांना असह्य वेदना होत होत्या त्यासाठी अनेक ठिकाणी तपासणीअंती ते अवघे ६ महीने जिवंत राहतील असे सांगण्यात आले होते त्यानंतर त्यांनी सोमाजीगुडा येथील यशोदा हॉस्पिटल गाठत सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांच्या मार्गदर्शनात उपचारांस सुरूवात करण्यात आली

प्राथमिक तपासणी अंती तब्बल १२ तास चाललेल्या रोबोटीक सर्जरीव्दारे त्यांची कॅन्सरग्रस्त अन्ननलिका काढून टाकत आतड्यापासून नवीन अन्ननलिका प्रत्यारोपित करुन श्री उपेंद्र विष्णुपुरीकर यांस जिवनदान दिले होते त्यावेळी ६ महीने आयुष्य सांगण्यात आलेले श्री उपेंद्र हे आजरोजी ५० वर्षाचे असून सर्वसामान्यपणे जिवन व्यतित करत आहेत श्री उपेंद्र यांनी त्यांचे भाऊजी श्री शिरीष पांडे,श्री रवि पेशकार व टिम यशोदाचे विशेष आभार मानले …

सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांच्या विषयी ः

ऑन्कोलॉजी आणि कर्करोग काळजी क्षेत्रात त्यांचे उल्लेखनिय  योगदान असून त्यांनी मागील १६  वर्षांहून अधिक काळात गंभीर कॅन्सर ग्रस्त असलेल्या १५००० पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्या  आहेत यात अद्यायावत असे रोबोटिक आणि लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेतील अग्रगण्य तंत्रज्ञानासह केल्या आहेत दरम्यान त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो रुग्णांना जिवनदान दिले आहे तसेच डॉ. सचिन यांची दर महीन्याच्या पहील्या बुधवारी व्हिजिट असते तरी गरजू रुग्णांनी व कॅन्सर ग्रस्तांनी याचा लाभ घ्यावा

यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथील वैदयकीय मदतीबद्दल तेथील जनसंपर्क अधिकारी श्री राम देशमुख ७९९५५०४०२६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here