भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संतोष गव्हाळे राजीनामा देण्याच्या तयारीत ?

0

जामखेड तालुका प्रतिनिधी 

भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते  संतोष गव्हाळे हे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारीत असून भाजपातील अंतर्गत कळामुळेच  राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या असून यामुळे एकच खळबळ उडणार आहे त्यामुळे विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या समोर संतोष गव्हाळे याची नाराजी दूर करण्याचे आव्हान असणार आहे.

भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून संतोष गव्हाळे यांची ओळख असून सर्वसामान्य कुटूंबातील असलेले संतोष गव्हाळे यांचा जामखेड तालुक्यात मोठा जनसंपर्क असून समता मित्र मंडळामार्फत युवकाचे मोठ्या प्रमाणावर संघटन असून गेल्या चारच महिन्यापूर्वी संतोष गव्हाळे यांना युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पद देण्यात आले होते.

पदाचा उपयोग करीत . मात्र गेल्या काही दिवसापासून संतोष गव्हाळे हे नाराज असल्याच्या चर्चाना ऊत आला असून संतोष गव्हाळे सध्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चाना ऊत आला असून संतोष गव्हाळे यांची नाराजी भाजप व सभापती प्रा राम शिंदे कशाप्रकारे दूर करतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून भाजपातील निष्ठवंत कार्यकर्यांवर अन्याय होत आहे नाराजीचा दूर दिवसेंदिवस वाढत चालेले आहे याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here