ग्रामरत्न ग्राममर्मी पुरस्काराने स्वाती लोंढे सन्मानित

0

दौड-रावणगाव, परशुराम निखळे :

ग्रामविकास मीडीया ॲंड फाऊंडेशन तथा पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ग्राममर्मी सन्मान सोहळा पुण्याच्या श्रीगणेश कला क्रिडा मंच येथे पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष,निवृत्त माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव मगर हे होते.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,दौंडचे आमदार राहुल कुल,पुणे जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद,ग्रामविकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विवेक ठाकरे,संयोजिका धनश्री ठाकरे,भाग्यश्री ठाकरे,सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतराव पाटील,इन्फानाईट सोसायटीचे नवनाथ आवताडे हे उपस्थित होते. यावेळी स्वाती लोंढे यांना “ग्रामरत्न ग्राममर्मी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार हा सर्वाधिक वृक्षलागवड,१००%महिला बचतगट,ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन,तसेच उपक्रमशील कार्यासाठी देण्यात आला.

“पुरस्कार ही आपण केलेल्या कामाची पोचपावती असते,पुरस्कारामुळे अजून जास्त जबाबदारी वाढल्याची भावना ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे यांनी व्यक्त केली. सध्या स्वाती लोंढे यांच्याकडे दौंड तालुक्यातील स्वामीचिंचोली व रावणगांव ग्रामपंचायतींचा पदभार आहे.स्वामीचिंचोली गावासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here