आदिवासी महिलेस जातीवाचक शिवीगाळ,विनयभंग करून मारहाण

0

माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या १९ समर्थकांवर ॲट्रॉसिटी पॉस्कोसह इतर गुन्हे दाखल

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

             राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करून जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या १९ समर्थकांवर ॲट्रॉसिटी, पॉस्कोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत  आदिवासी समाजातील ३५ वर्षीय विवाहित महिलेले दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, २६ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गावात कोठेतरी वाद विवाद झाल्यामुळे तेथे जमलेले काही लोक माझ्या घरी मारहाण करण्याच्या उद्देशाने आले.त्यावेळी मी माझ्या घरात स्वंयपाक करीत असताना आमच्या घरावर दगड फेकल्याचा आवाज आल्याने मी स्वंयपाक घरातुन बाहेर आले.त्यावेळी माझे घरासमोर तरुणांची मोठी गर्दी झालेली होती.हे सर्वजण मोठ मोठ्या आवाजात शिवीगाळ करत होते.

             

 मी स्वयंपाक घरातून बाहेर आले त्यावेळी सुधीर टिक्कल व मंगेश ढुस या दोघांनी माझ्या अंगाला झटुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून छातीवर हाताच्या चापटीने मारहाण करून मंगेश ढुस याने लाकडी दांड्याने माझ्या उजव्या हातावर  मारहान केली. माझा आरडा ओरडा ऐकून माझी १३ वर्षीय मुलगी माझ्या आईला मारहान करु नका असे म्हणत असताना, तिच्या सोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करू हाताच्या चापटीने मारहान करुन तिला ओट्याच्या खाली लोटुन दिले. तसेच माझ्या घरासमोर लावलेल्या चारचाकी टाटा झिप, एक बुलेट व एक पॅशन प्रो मोटारसायकलचे तोडफोड करून नुकसान केले आहे. तसेच एक सुझुकी मोटारसायकल व एक स्कुटी लोटुन खाली पाडल्या.घरासमोर ओट्यावर ठेवलेले डी.जे साऊंड सिस्टीमचे साहीत्य फोडुन नुकसान केले. घरातील कुलर, फ्रिज, इलेक्ट्रीक स्विच बोर्ड यांची तोडफोड केल्याने घरातील लाईट बंद झाल्याने घरातील बारीक सारीक वस्तुची तोडफोड करून नुकसान केले.मला व माझ्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करुन यांना गावात राहू द्यायचे नाही. याना जिवे ठार मारुन टाकायचे आहे. अशी धमकी देत होते.

              यावेळी घरातील इलेक्ट्रीक बोर्डावर ठेवलेले १ हजार २५० रुपये रोख रक्कम चोरुन गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे डोरले बळजबरीने सुधीर टिक्कल यांने तोडुन नेले. त्यांनतर हा सर्व प्रकार पाहुन मला चक्कर आल्याने माझ्या डोळ्या समोर अंधा-या आल्याने तेथे माझ्या नातेवाईकांनी मला सदर ठिकाणावरुन डॉ.नितीन नेहे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेवुन गेले तेथे माझ्यावर उपचार झाल्यानंतर शुद्धीवर आल्यानतंर मी घरी आली सदर प्रकराबाबत माझी मानसिक स्थिती बरी नसल्याने तसेच आज रोजी माझी मानसिक स्थिती चांगली असल्याने राहुरी पोलीस स्टेशनला उपस्थित राहुन  फिर्याद दाखल केली आहे.असे फिर्यादीत म्हंटले आहे.

               आदीवासी महिलेच्या फिर्यादीवरुन  मंगशे ढुस, सुधीर टिक्कल , पप्पु कदम ,बापु कदम, अभिजित विश्वास कदम, दादा गडाख,किशोर गडाख  सतिष वांळूज, रुपेश कुऱ्हे , पिनु चव्हाण,बाल्या चहावाला, रवि चहावाला,ओंकार मुसमाडे, वैभव चव्हाण,अशोक मुसमाडे, विकी वाळके, महांकाळ मेजर यांचा मुलगा,  अशोक निर्मळ, हिरामन ढुस आशा १९ जणा विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुजे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here