छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना प्रकरण
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
राहुरीतील कोळीवाडा परिसरात असलेल्या बुवासिंदबाबा समाधी परिसरात असलेल्या तालमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी शोध घेतला आहे. ते पोलिसांच्या नजर कैदेत आहेत.सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या आदेशाने या आरोपींची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.पोलिसांनी हे आरोपी उघड केले तर आरोप करणारे अनेकजण तोंडावर पडणार आहेत. असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापुर्वीच पोलिसांच्या एका टिमने आरोपींचा शोध सुरु केला होता. सायंकाळ पर्यंत आरोपी शोधले हि होते.पोलिस आरोपींची नावे जाहिर करणार होते.परंतू लोकप्रतिनिधीनी नावे जाहिर करण्यास खोडा घातला.
आ.शिवाजीराव कर्डीले यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्तारोको सुरु असताना विशिष्ट एका समाजावर आरोप केले होते.यातून तरुणांची माथे भडकण्याची चिन्हे निर्माण झाली होती. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सुरात सुर मिसळल्याने सर्वच जण विशिष्ट एका समाजावर तुटून पडले होते.रात्री पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली.आरोपींची माहिती लोकप्रतिनिधींना सांगितल्यावर लोकप्रतिनिधींच्या पाया खालची वाळूच सरकली होती. परंतू आपण जे आरोप केले त्या समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल त्यामुळे सत्तेतील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने आरोपींचे नावे गुलदस्त्यात ठेवण्यास सांगितले गेले असल्याची चर्चा पोलिस वर्तूळात दबक्या आवाजात सुरु आहे.
स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनीही दोन दिवसांत आरोपी अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा देत दोन दिवसांत विटंबना झालेल्या ठिकाणीच छत्रपतींचा नवीन पुतळा उभारण्याची घोषणाही केली होती.लोकप्रतिनिधींनी पोलिसांना शांतता कमिटीची बैठक बोलविण्याच्या सुचना दिल्या.पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक बोलविली. या बैठकीत पोलिसांनी १९ जणांची चौकशी पुर्ण झाली आहे.१०७ जणांची चौकशी करण्याची बाकी आहे.असे उत्तर देवून आंदोलनकर्त्यांची बोळवण केली.या बैठकीत आ.शिवाजीराव कर्डीले यांनी घुमजाव करत काल पर्यंत विशिष्ट एकाच समाजावर आरोप करणारे अचानक बदल कसा झाला त्यांच्या भाषणात आरोपी कोणत्याही समाजाचे असो त्यांना शिक्षा झाली पाहिजे असा सुर निघल्याने या विटंबने मागे काहीतरी दडलय हे ओळखण्यास कोणत्या जोतीषाची गरजच पडली नाही.यावरुन एकच स्पष्ट झाले आहे.पोलिस व लोकप्रतिनिधी यांना आरोपींची नावे माहित झाली आहे.परंतू हे उलटे आपणावर शेकणार असल्याने लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर करुन आरोपींचे नावे जाहिर करण्या ऐवजी गुलदस्त्यात ठेवण्यास भाग पाडले आहे.
माजी आ.प्राजक्त तनपुरे यांनी आरोपींचा शोध लागत नाही तो पर्यंत बेमुदत बंदची घोषणा केली होती. या बंदचा लोकप्रतिनिधी चांगलाच फटका बसणार होता. त्यामुळे आ.शिवाजी कर्डीले व राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. आणि बेमुदत बंद मागे घेण्यात आल्याचे खुद्द अरुण तनपुरे यांनी पत्रकार परिषदमध्ये जाहिर केले. या पत्रकार परिषदेनंतर मात्र राहुरीत या बाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली. लोकप्रतिनिधीनी एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न केला परंतू विशिष्ट एक समाज मात्र आजही दडपणाखाली आहे. पोलिस लोकप्रतिनिधीचा दबाव झुगारुन खऱ्या आरोपींचे नावे जाहिर करतील का? असा प्रश्न सर्वसामान्य वर्गातून विचारला जात आहे.
पोलिसांनी शनिदेवावर हाथ ठेवून सांगावे?
देवळाली प्रवरा येथे सर्व पक्षीय बैठक बुधवारी सकाळी आयोजित केली होती.या बैठकीत माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी शिवाजीमहाराज पुतळ्याच्या विटंबनेतील आरोपी पोलिसांना माहित आहे.परंतू पोलिसांवर दडपण आहे.यास सत्ताधारी भाजपाचे सत्यजित कदम यांनी दुजोरा दिला.हाच धागा पकडूनपत्रकार रफीख शेख यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे.पुतळा विटंबना ज्या दिवशी झाली त्याच दिवशी सायंकाळी आरोपींचा पोलिसांनी शोध लावला आहे.परंतू आंदोलनातून जी दिशाभूल केली त्यावर ठाम राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर दबाव आणला आहे.आज येथे पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील उपस्थित आहे.त्यांनी शनिदेवार हात ठेवून सांगावे विटंबनेतील आरोपींचा शोध लावलेला आहे की नाही? असे म्हणताच सर्वच जण आवक झाले.