देवळालीतील १९ तरुणांवरील खोटे गुन्हे मागे घ्या – मराठा एकीकरण समिती
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरीच्या इतिहासात २६ मार्च हा काळा दिवस ठरला आहे. अंखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबन झालेल्या घटनेतील आरोपी निष्पन्न झाल्याची माहीती आहे. माञ पोलीस आरोपींची नावे जाहीर करत नाहीत त्यामुळेच आता पोलिसांना जमत नसेल तर सीबीआयकडे हा तपास वर्ग करावा अजुन १० दिसतात आरोपींची नावे जाहीर झाले नाहीत तर राज्यभर उद्रेक होऊन आंदोलनाचा भडका उडेल तसेच देवळाली प्रवरातील 19 तरुणांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्या असा इशारा देवळाली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिला आहे.
राहुरी शहरातील पुतळा विटंबन घटनेतील आरोपींची नावे जाहीर करा तसेच देवळाली प्रवरा येथील तरुणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे घ्या, या प्रमुख मागणीसाठी मराठा एकीकरण समितीच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यासमोर आज गुरवारी दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नायब तहसीलदार संध्या दळवी यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे,संभाजी ब्रिगेड गोरख दळवी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, शामराव निमसे,विक्रम तांबे,शिवाजी सागर,ओंकार खेवरे,बाळासाहेब उंडे, कांता कदम,नितीन पटारे, गोरख मुसमाडे, सचिन म्हसे,सुधाकर कदम,आबासाहेब शेटे,रवींद्र म्हसे,सचिन ढुस,प्रकाश संसारे, राजेंद्र लोंढे,अमित पाटील,शहाजी कदम,माऊली वाणी,नारायण धोंगडे, बाळासाहेब लोखंडे,सचिन ढुस,प्रशांत मुसमाडे,सुधाकर कदम, विशाल मुसमाडे, अमोल कदम,अनंत कदम,जयेश मुसमाडे, नितीन देशमुख, दत्तात्रय म्हसे,संदीप आढाव, डॉ.विश्वास पाटील,संतोष हारदे, नारायण कडू,सचिन कोठुळे, भारत शेटे,समीर पठाण,सचिन सरोदे, विजय गव्हाणे,राजेंद्र चव्हाण,रामेश्वर तोडमल, राजेंद्र ढुस,सुधीर खुरुद,प्रवीण देशमुख, संतोष झावरे,गोरख मुसमाडे,सुभाष पठारे, डॉ.किशोर म्हस्के, कुमार कदम, संदीप कदम,शशी खाडे, सचिन शेटे,संतोष चव्हाण, सागर खांदे, सतीश वने, अनिल चव्हाण,मधुकर घाडगे, कैलास बानकर,हरीश वाळुंज,सुधीर पठारे,आदिंसह विविध पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.