उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )
१४ एप्रिल रोजी उरण तहसील कार्यलयासमोर होणाऱ्या उपोषणास हनुमान कोळीवाडा मधील ग्रामस्थांचा पाठिंबा नसल्याचे प्रसिद्धी पत्रका द्वारे जाहिर करण्यात आले असून त्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की हनुमान कोळीवाडा गावचे पुनर्वसन अपूर्ण आहे ते पूर्ण करावे ही मागणी सर्वांचीच आहे. परंतु ग्रामपंचायत बेकादेशीर आहे हे पूर्ण चुकीचे व हास्यस्पद आहे कारण गेल्या सहा पंचवार्षिक ग्रामपंचायत मतदान या ठिकाणी झालेले आहे. आणि ग्रामपंचायत मध्ये ज्यांनी अफरातफर गैरव्यवहार केले त्यांच्यावर त्या संदर्भात शासनाकडून गुन्हे नोंदवून वसुलीच्या केसेस न्यायप्रविष्ट आहेत अशाच लोकांनी हे उपोषण गावावर लादले आहे. याला आमचे गावकरी ग्रामस्थ या नात्याने समर्थन नाही.
या आमरण उपोषणा मध्ये संपूर्ण गावाचा कोणताही उल्लेख संबंध नाही स्वार्थापोटी आणि प्रशासनाला गावातील नागरिकांना वेटीस धरून त्रास देऊन सदरच्या संघटना / कमिटी या वैयक्तिक आमरण उपोषण करीत आहेत यामध्ये गावाचा कोणताही संबंध नाही याकरिता अशा कमिट्या उपोषण करणार असतील तर याची संपूर्ण गाव म्हणून आम्ही गावाचे ग्रामस्थ म्हणून कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही त्यामुळे अशा काही लोकांमुळे गावातील ग्रामस्थ वेठीस धरले जात असून पाण्यासारख्या नागरी सुविधांपासून गावातील व गावा लगत असणाऱ्या ग्रामस्थांना वंचित ठेवले जात आहे.
महोदय या आंदोलनास आम्हा ग्रामस्थांचा शंभर टक्के कोणताही पाठिंबा नसून या संदर्भातील कोणतीही जबाबदारी हनुमान कोळीवाडा या गावावर न लादता संबंधित खोटे कृत्य करणाऱ्या कमिटी ज्यांनी पत्र दिलेले आहे अशा कायदा सुव्यवस्था हातात घेऊन प्रशासनास वेठीस धरणा-या अशा लोकांना कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. गेली कित्येक वर्ष गावामध्ये विकासाची कोणतीही कामे करण्यात आली नाहीत. याउलट शासनामार्फत येणारा गोरगरीब जनतेच्या कल्याणाकरता पंधरावा वित्त आयोगाचा निधी येण्यापासून या लोकांनी रोखून ठेवला असल्याचा आरोप या पत्रकाद्वारे करण्यात आला आहे.