हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने रक्त तपासणी शिबीर व महाप्रसाद पंगत संपन्न..!

0

सामाजिक कार्यकर्त्या सौ सदिच्छा सोनी पाटील यांचा अनोखा उपक्रम

नांदेड प्रतिनिधी :

येथील मगनपुरा नवा मोंढा भागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ सदिच्छा सोनी पाटील यांच्या वतीने तमाम भाविक भक्तांसाठी हनुमान जन्मोत्सवानिमित्त दक्षिण मुखी हनुमान मंदिर मदनपुरा नांदेड येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्त तपासणी शिबिर व महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला

यावेळी रक्त तपासणी शिबिर व महाप्रसाद पगंत अशा एकत्रित कार्यक्रमासाठी भाजपाचे विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, महानगराध्यक्ष अमर राजूरकर,माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, विजय येवनकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि.स्वप्निल इंगळे पाटील, विखे पाटील कृषी परिषेदेचे भागवत देवसरकर, सुनिल भालेराव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. मगनपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील शेकडो भाविक भक्तांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here