येवला (प्रतिनिधी)
रविवारची धम्म शाळा ह्या उपक्रमा अंतर्गत येथील मुक्तीभूमी स्मारक येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था,पिंपळगांव बसवंत नाशिकच्या वतीने वय वर्षे पाच पासून पुढील वयोगटातील बालक,बालिका,युवक,युवती यांची धम्म संस्कार प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवार दिनांक २४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ७:३० ह्या दरम्यान आयोजित करण्यात आली असल्याची माहिती धम्ममित्र प्रा.गजानन सुर्यकर,इंजि.अक्षय गरुड यांनी दिली आहे.
कार्यशाळेस प्रा.मिलिंद गुंजाळ हे प्रशिक्षक म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुरेश खळे,महेंद्रभाऊ पगारे,बापू वाघ,राजरत्न वाहुळ,हिरामण मेश्राम,बी.डी. खैरनार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था,पिंपळगांव बसवंत नाशिकचे संस्थापक प्रा.एस.डी.शेजवळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ह्यावेळी सायगांव ग्रामपंचायत सरपंच रंजनाताई पाठारे,शेवगे सातारे वि.वि.कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक अँड.चंद्रकांत निकम यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक प्रा.गजानन सुर्यकर,इंजि.अक्षय गरुड यांनी दिली आहे.