पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा दौंड तालुका अॅड बार असोसिएशनच्या वतीने निषेध

0

दौड-रावणगाव, (परशुराम निखळे):

काल पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा संपूर्ण देशातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दौण्ड तालुका अॅड बार असोसिएशननेही या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला असून दौंड तालुका अॅड बार असोसिएशन तर्फे मा. तहसीलदार यांचेकडे लेखी निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला आहे.

काल पहलगाम येथे आतंकवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या चालवल्या होत्या. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. कालच्या या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अनेक ठिकाणी या हल्ल्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहे. तर खुद्द जम्मू काश्मीर येथेही या हल्ल्याचे पडसाद उमटून श्रीनगर आणि अन्य ठिकाणी दुकाने बंद ठेऊन निषेध नोंदविण्यात आला आहे.

दौंड तालुक्यातही याचे पडसाद उमटत असून दौंड बार असोसिएशन नेही आपला निषेध नोंदवला आहे. यावेळी असोसिएशन चे अध्यक्ष अॅड. प्रशांत गिरमकर, अॅड. तुषार चौधरी, अॅड. आकाश शिंदे, अॅड. ओंकार चौधरी, अॅड. रोंघे व संजय कुकडे उपस्थित होते. नायब तहसीलदार तुषार बोरकर यांनी निवेदन स्वीकारले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here