Accused arrested for circulating objectionable photos of minor girl | अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो प्रसारित करणारा आरोपी जेरबंद: हडपसर पोलिसांकडून तांत्रिक तपासानंतर 27 वर्षीय तरुणाला अटक – Pune News

0

[ad_1]

एका अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली. तांत्रिक तपास करुन पोलिसांनी आरोपीचा माग काढला.

.

किसन हनुमंत तोरडमल (वय २७, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्य आरोपीचे नाव आहे. आरोपी तोरडमल याने एका ओळखीतील मुलीची नकळत आक्षेपार्ह फोटो काढले होते. मोबाइलवरुन त्याने चित्रीकरण केले होते. त्याने फोटो, व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारित केल्याचे उघडकीस आल्यानंतर मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तोरडमल याला अटक केली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलानी, सत्यवान गेंड, पोलीस कर्मचारी अविनाश गोसावी, महावीर लोंढे, प्रकाश सावंत, सुनील आव्हाड यांनी ही कामगिरी केली. सोशल मीडियावर ओळखीतील अल्पवयीन मुली, तसेच तरुणींचे फोटो प्रसारित करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यांना धमकावून गैरफायदा घेतला जातो. असे प्रकार आढळून आल्यास त्वरीत पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

डाॅक्टरच्या मृत्यू प्रकरणात पसार टँकरचालक अटकेत

दुचाकीस्वार डाॅक्टर तरुणाला धडक देऊन पसार झालेल्या टँकरचालकाला पोलिसांनी अटक केली. हडपसर भागात ही घटना घडली होती. पसार झालेल्या टँकरचालकाचा माग काढून पोलिसांनी त्याला अटक केली.

राजेंद्र एकनाथ तळेकर (वय ५१, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. डाॅ. ईश्वर साहू (वय २९, रा. सातववाडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. डाॅ. साहू हे मूळचे छत्तीसगडचे रहिवासी आहेत. ते हडपसर भागातील प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेत प्रशिक्षण घेत होते. हडपसर-सातववाडी रस्त्याने ते दुचाकीवरुन सोमवारी (२१ एप्रिल) निघाले होते. त्या वेळी पीएमपी थांब्यासमोर दुचाकीस्वार डाॅ. साहू यांना भरधाव टँकरने धडक दिली. अपघातानंतर टँकरचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या डाॅ. साहू यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here