[ad_1]
Pahalgam Attack Terrorist Use This App: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या भीषण हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवाद्यांचं पाकिस्तानशी कनेक्शन असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पहलगाममधील हा भ्याड कल्ल्यासंदर्भातील माहिती हळूहळू पुढे येत आहे. असं असतानाच हे दहशतवादी नेमके हजारो पर्यटक असलेल्या बैसरन येथे पोहोचले कसे याबद्दलची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी नेमकं कोणतं अॅप्लिकेशन हा ठिकाणी पोहचण्यासाठी वापरलं हे स्पष्ट झालं आहे.
गुगल मॅप्स नाही हे अॅप्लिकेशन वापरलं……
दहशतवाद्यांनी बैसरनच्या पठारावर पोहचण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला आहे असं तुम्हालाही वाटत असेल तर तसं नाहीये. या दहशतवाद्यांनी सर्वाधिक पर्यटक ज्या ठिकाणाला भेट देतात त्या बैसरन येथे पोहचण्यासाठी गुगल मॅप वापरलं नाही. या दहशतवाद्यांनी अप्लाइन क्वेस्ट (Alpine Quest App) नावाच्या अॅप्लिकेशनचा वापर केल्याचं उघड झालं आहे. हे अॅप्लिकेशन नेमकं आहे तरी कसं आणि त्याचा दहशतवाद्यांनी कसा वापर केला पाहूयात…
हेच अॅप्लिकेशन का वापरतात?
अप्लाइन क्वेस्ट (Alpine Quest App) या अॅप्लिकेशनचं सर्वात मोठं वैशिष्ट्यं म्हणजे इंटरनेटची कनेक्टीव्हिटी नसतानाही ते काम करतं. झिरो मोबाईल कनेक्टीव्हिटी असलेल्या भागामध्ये हे अॅप्लिकेशन दहशतवाद्यांना हल्ल्याच्या ठिकाण शोधण्यासाठी फायद्याचं ठरलं. स्थानिकांची मदत घेण्याचा पर्याय दहशतवाद्यांनी टाळला. अशी मदत घेतली तर हल्ल्याआधीच आपणं पकडले जाऊ शकतो अशी भीती वाटत असल्याने आता दहशतवादी नेव्हिगेशनसाठी अल्पाइन क्वेस्टसारख्या अॅप्लिकेशनवर अवलंबून राहतात. अगदी कठुआ येथील दहशतवादी हल्ला असो किंवा इतर अतिरेकी हल्ल्यांमध्येही या अॅप्लिकेशनचा वापर झाल्याचं समोर आलं आहे.
2024 पर्यंत अनेक हल्ल्यांसाठी झाला याचा वापर
दहशतवाद्यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या नेतृत्वाखाली हे अॅप्लिकेशन वापरण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून जंगली भागांमध्ये दहशतवाद्यांचे गट एकमेकांच्या संपर्कात राहतात. 2024 मध्ये सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या सर्वच दहशतवादी हल्ल्यांमध्ये हल्लेखोरांनी हेच अॅप्लिकेशन वापरल्याचं समोर आलं आहे. या अॅप्लिकेशनच्या मदतीने घनदाट जंगलं, नद्या, डोंगराळ भागांमध्ये लोकेशन सहज शोधता येते.
ऑस्ट्रेलिया कनेक्शन
अप्लाइन क्वेस्ट (Alpine Quest App) हे एक ऑस्ट्रेलियन अॅप्लिकेशन आहे. याचा वापर खास करुन ट्रेकर्सकडून केला जातो. मात्र दहशतवाद्यांना या अॅप्लिकेशनचं ऑफलाइन व्हर्जन दिलं जातं. यामध्ये आधीपासूनच सीआरपीएफचे तळ, तसेच नाकाबंदी कुठे असेल याबद्दलच्या माहितीचा समावेश असतो.
[ad_2]