आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली. जिल्ह्यातील या कार्यक्षम आणि धाडसी नेत्याच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
.
ते अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते होते. संग्राम जगताप आमदार असले तरी समाजातील सर्व घटकांना एकत्र ठेवण्याचे काम अरुणकाकांनी केले, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
राजकारणातील स्वच्छता, शिस्त आणि नियोजन या गोष्टी अरुणकाकांच्या स्वभावाचा भाग होत्या. त्यांचे संघटन कौशल्य आणि समाजाभिमुख दृष्टिकोन प्रेरणादायी होता.
उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंत्यविधी शासकीय इतमामात करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ आदेश दिले, असेही पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी अरुणकाकांच्या अकाली जाण्याबद्दल दुःख व्यक्त केले.