फोनच्या स्पीकरमधून आवाज फारच कमी येतोय; या तीन सोप्या ट्रिक्स वापरा, पैसेही वाचतील

0

[ad_1]

Smartphone Speakers Repair Tips: फोन नवीन असेल तर त्याचे इतर फीचर्सदेखील एकदम नवीन असतात. पण बरीच वर्षे वापरल्यानंतर फोन जुना होऊ लागतो. काही महिन्यानंतर फोनचा साउंड कमी होण्यास सुरुवात होते. काही लोकांना वाटतं की, फोनच्या स्पीकरमध्ये पाणी गेल्यामुळं किंवा धुळ साचल्यामुळं स्पीकरमधून कमी आवाज येतो. मात्र हा तर्कदेखील तुमचा बरोबरच आहे. पाणी, धुळ-माती यामुळंही स्पीकर लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळं फोनचा आवाज कमी यायला लागतो. तसंच, गाणी ऐकताना आणि चित्रपट पाहतानाही आवाज कमी यायला लागतो. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला फोनचा स्पीकर कसा साफ करायाच, याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्ही घरबसल्याच स्पीकर साफ करु शकणार आहात. 

स्पीकर साफ करण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या

स्पीकर साफ करण्यापूर्वी सगळ्यात आधी तुमचा फोन स्विच ऑफ करा

स्पीकर ग्रिलवर कोणत्याही पद्धतीचे लिक्विड उदा. पाणी, थिनर, अल्कोहल टाकू नका. यामुळं फोनमधील इतर पार्ट खराब होऊ शकतात. 

टोकदार वस्तू म्हणजेच पिन, सुईचा वापर स्पीकर ग्रिलसाठी करू नका. यामुळं स्पीकरचा पडदा फाटू शकतो. 

स्पीकर साफ करण्यापूर्वी येथे लक्ष द्या!

सॉफ्ट ब्रिसल असलेला ब्रश वापरा

एक स्वच्छ आणि कोरडा ब्रिसल असलेला टुथब्रश किंवा छोटा पेंट ब्रश वापरा. यामुळं स्पीकर ग्रिलवर हलक्या हाताने ब्रशने साफ करा. ब्रशमुळं ग्रिलवरील धुळ आरामात बाहेर निघू शकेल. लक्षात ठेवा की, ब्रश एकदम कोरडा असूद्यात. 

कंप्रेस्ड एअर 

इलेक्ट्रॉनिक्स साफ करण्यासाठी कंप्रेस्ड एअर कॅन हा एक खूप छान टुल आहे. यामुळं स्पीकर ग्रीलपासून थोडं अंतरावर ठेवून हवा स्प्रे करा. यामुळं यात अडकलेली धुळ बाहेर खेचली जाईल. 

क्लीनिंग पुट्टी किंवा स्लाइम

बाजारात खास इलेक्ट्रॉनिक्ससाठी खास डिझाइन केलेले टुल असतात. त्यात क्लिनिंग पुट्टी आणि स्लाइमदेखील आहे. हे स्पीकर ग्रिलवर हलक्या हाताने दाबून घ्या. हा पदार्थ आतील धुळ आणि माती बाहेर काढेल. 

इअर क्लिनिंग बड्स 

जर तुम्ही कोरड्या ईअरबड्सचा वापर करत असाल तर स्पीकर ग्रिलवर हलक्या हाताने ईअरबड्स फिरवा. लक्षात ठेवा की, कापूस आत फसला जाणार नाही. तसंच, कापूस ओला असल्यास वापरू नका. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here