Auto news Honda CB650R E Clutch teased ahead of India launch Expected Price Features

0

[ad_1]

Honda CB650R E-Clutch : भारतात भौगोलिक रचनेनुसार बदलणारी रस्त्यांची स्थिती, वळणं आणि एकंदर बाईकप्रेमींचा प्राधान्यक्रम लक्षात घेता विविध कंपन्यांनी आतापर्यंत अनेकदा बाईकचे एकाहून एक सरस मॉडेल लाँच केले आहेत. त्यातच आता जपानी वाहन निर्माता कंपनी भारतीय बाजारात एक अशी अफलातून बाईक अर्थात दुचाकी आणत आहे जी पाहून अनेक मंडळी लगेचच ती खरेदी करण्याचा बेतही आखतील. 

मोटरसायकल रायडिंगचा अंदाजच बदलणारी ही बाईक आणणारी कंपनी आहे होंडा. कमालीचं आधुनिक तंत्रज्ञान ही कंपनी लाँच करत नेक्ड- स्ट्रीट बाईक होंडा सीबीआर 650 आर (Honda CB650R E-Clutch) बाईकप्रेमींसाठी सादर केली जात आहे. या बाईकचा टीझर नुकताच कंपनीनं प्रदर्शित केला असून त्याची बाईकप्रेमींमध्ये बरीच चर्चासुद्धा पाहायला मिळत आहे. 

काय आहेत Honda CB650R E-Clutch चे फिचर्स? 

मुळात ही बाईक भारतीयांसाठी नवी नसून, आधीपासूनच तिची विक्री भारतात सुरू आहे. मात्र, आता ही बाईक एका नव्या तंत्रासह म्हणजेच ई क्लच या फिचरसह लाँच केली जात आहे. गेल्या बऱ्याच काळापासून या तंत्रावर कंपनी काम कर असून, काही महिन्यांपूर्वीच जागतिक स्तरावरही या तंत्रज्ञानासह बाईक लाँच करण्यात आली होती. 

किमतीच्या बाबतीत ही बाईक भुवया उंचावर आहे. कारण तिची मूळ किंमतच 9.20 लाख रुपये असून ई क्लच तंत्रज्ञानामुळं बाईकच्या किमतीत आणखी 30 ते 40 हजार रुपयांची वाढ अपेक्षित आहे. 

काय आहे ई क्लच तंत्रज्ञान? 

होंडाच्या या बाईकमध्ये देण्यात आलेलं ई क्लचचं तंत्रज्ञान हे अतिशय वेगळं असून, त्यामध्ये ऑटोमेटेड क्लच सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळं बाईकला क्लच लेस गिअर शिफ्टींग उपलब्ध होणार असून त्यामुळं बाईक रायडिंगची पद्धत पूर्णपणे बदलेल. या आयएमटी प्रणालीमध्ये क्लच अस्तित्वात नसला तरीही त्यात मॅन्युअल गिअरबॉक्स मात्र देण्यात आला आहे. क्लच अॅक्टीव्ह आणि इनअॅक्टीव्ह करण्यासाठी गिअर लिवरवर असणाऱ्या एका इंटेलिजेंट इंटेंशन सेंन्सरचा वापर केला जातो. त्यामुळं या बाईकला दिसणारा क्लच हा फक्त दिखाव्यासाठी असेल हे लक्षात घ्या. 

स्टँडर्ड Honda CB650R आणि ई क्लच वेरिएंट या दोन्ही मॉडेलमध्ये लिक्विड कूल्ड 649 सीसी इनलाईन फोर सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. ज्यातून 65 hp पॉवर आणि 9500 आरपीएम वर 63 न्यूटन मीटर इतका टॉर्क जनरेट होतो. 6 स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह बाईकचं इंजिन जोडलं गेल्यामुळं या बाईकच्या दोन्ही मॉडेलमध्ये फक्त ड्रायव्हिंग स्टाईलचाच बदल असेल. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here