[ad_1]
Best Cars Under 5 Lakh in India: एक घर, एक कार असावी असं प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. मात्र कारच्या किंमती पाहता प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करु शकेलच असं नाही. त्यामुळं बजेटमध्ये बसेल अशा कारही अनेक कंपन्याकडून लाँच केल्या जातात. जर तुम्ही देखील 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत कार पाहत असाल तर या कारही तुमच्यासाठी बेस्ट आहेत. आजही भारतात अशा 3 कार आहेत ज्या 5 लाखापर्यंतच्या कमी बजेटमध्ये येतात. या कारमध्ये बेसिक फीचर्सदेखील येतात. तसंच, या कारचे मायलेजदेखील चांगले आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या कार.
Alto K 10
Alto K 10 ही तुमच्या बजेटमध्ये येणारी एंट्री-लेव्हल कार आहे ज्यात पुरेशी जागा, फिट अँड फिनिश आणि उपकरणे देते. या कारचे इंधन कार्यक्षम आहे. ड्रायव्हेबिलिटीदेखील चांगली आहे. या कारच्या बेस मॉडेलची किंमत दिल्लीमध्ये ऑन-रोड 4.37 लाखांपर्यंत जाते. ही कार पेट्रोलसह 24.39 किमी प्रति लिटर मायलेज देते.
Renault Kwid
ही फ्रेंच कंपनीची भारतात विकली जाणारी सर्वात स्वस्त कार आहे. दिल्लीमध्ये क्विडची ऑन-रोड किंमत 5.31 लाख ते 7.38 लाख रुपयांपर्यंत आहे. एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख ते 6.45 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. क्विड सीएनजीमध्ये येते. या कारमध्ये आधुनिक डिझाइन आढळते. या कारमध्ये 5 लोकांसाठी पुरेशी जागा आहे. ही कार 22 किमी/लीटर मायलेज देते.
Maruti Suzuki S-Presso
ही मारुतीची हॅचबॅक कार आहे, जी अगदी एसयूव्हीसारखी दिसते. कारमध्ये 5 लोक बसू शकतील इतकी पुरेशी जागा आहे आणि ग्राउंड क्लीयरन्सही उत्तम आहे. ही गाडी खाच खळगे असलेल्या रस्त्यांवरदेखील आरामात धावू शकते. मारुती एस-प्रेसोची किंमत ₹4.26 लाखांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी ₹6.12 लाखांपर्यंत जाते. दोन्ही किमती एक्स-शोरूम आहेत. आजच्या गरजांनुसार सर्व आधुनिक वैशिष्ट्ये त्यात उपलब्ध आहेत.
[ad_2]