How To Stay Safe From Cyber Attack From Paksitan Hackers India Pak Tension; India Pakistan Tension दरम्यान सायबर अटॅक करतायत पाकिस्तानी हॅकर्स, असा कराल बचाव

0

[ad_1]

Cyber Attack Safety Tips: 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 26 लोकांनी आपला जीव गमावला. ज्यामध्ये 25 भारतीय नागरिक आणि एक नेपाळी पर्यटकांचा समावेश होता. या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सशस्त्र दलाने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरमधून प्रत्युत्तर दिलं. 

यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. आता भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली आहे. पण परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील हॅकर्सनीही सायबर हल्ले सुरू केले आहेत. अशा प्रकारे तुम्ही सायबर हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करू शकता.

सायबर हल्ला कसा टाळायचा

ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनंतर आता पाकिस्तानकडूनही भारतावर सायबर हल्ला केला जात आहे. या युद्धाच्या काळात, लोकांचा डेटा चोरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे सायबर हल्ले केले जात आहेत. डान्स ऑफ द हिलरी नावाचे मालवेअर हल्ले पाकिस्तानी हॅकर्सकडून केले जात आहेत. हॅकर्स हे मालवेअर मेसेज, ईमेल आणि सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या ग्रुप्सना पाठवत आहेत. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचा फोन किंवा लॅपटॉप हॅक होऊ शकतो.

हे टाळण्यासाठी, तुम्ही +९२ देश कोडसह पाठवलेल्या कोणत्याही संदेश, कॉल किंवा लिंकवर क्लिक करू नये. कारण हा नंबर पाकिस्तानचा आहे. अज्ञात ईमेल आणि अज्ञात लिंक्स उघडू नका. कोणत्याही प्रकारची पीडीएफ फाइल किंवा एपीके फाइल उघडू नका. ज्या लिंकच्या शेवटी .pk लिहिले आहे ती लिंक उघडू नका.

या गोष्टींची विशेष काळजी घ्या

सायबर हल्ले टाळण्यासाठी नेहमी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू ठेवा. तुमच्या फोन आणि लॅपटॉपवर अँटी-स्पायवेअर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. तुमच्या फोनमध्ये कोणतेही अज्ञात अॅप्लिकेशन इन्स्टॉल करू नका आणि लॅपटॉप, संगणक आणि फोनमध्ये फायरवॉल इन्स्टॉल करा आणि ते सक्रिय ठेवा. याशिवाय, जर तुम्हाला परदेशी नंबरवरून कॉल येत असतील तर. म्हणून त्यांच्याविरुद्ध सायबर क्राईमकडे तक्रार करा.

पाकिस्तानचे झी न्यूजवर सायबर अटॅक 

पाकिस्तानकडून Zee News वर सायबर अटॅक करण्याचा प्रयत्न झालाय. झी न्यूज वरील संभाव्य सायबर अटॅक निकामी करण्यात आलाय. पाकिस्तानमधून झी न्यूजवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. झी न्यूजच्या बातमीमुळे पाकिस्तान चिडलाय. त्यामुळे असे कारनामे करत असल्याचे म्हटले जात आहे.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here