New Look of 25 Year Old Mahindara Bolero and Bolero Neo Bold See Price Specifiction Details

0

[ad_1]

Mahindra Bolero Bold Edition New Look: सैन्यदल असो किंवा सामान्यांची वाहन पसंती, महिंद्राच्या वाहनांना कायमच कारप्रेमींकडून प्राधान्य मिळतं. अगदी कैक वर्षं मागे वळून पाहिलं तरीसुद्धा महिंद्राच्या वाहनांनी कायमच अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपूर आणि तितकाच यशस्वी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं आहे. आजवर या कंपनीच्या बऱ्याच कार मायलेज आणि लूकसाठी नावाजल्या गेल्या. त्यातलंच एक नाव म्हणजे बोलेरो. जवळपास 25 वर्षांपूर्वी लाँच झालेल्या या जबरदस्त कारचं नवं एडिशन कंपनीनं नुकतंच लाँच केलं आहे. बोलेरोच्या नव्या एडिशनला कंपनीनं बोल्ड एडिशन असं नाव दिलं असून, बोलेरो बोल्ड आणि बोलेरो निओ बोल्डमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळं ही कार कमाल अनुभव देत आहे.  

Mahindra Bolero Bold मध्ये नेमकं खास काय? 

Mahindra Bolero Bold या कारच्या नव्या एडिशनमध्ये एक्सटिरीअर आणि इंटेरिअर अॅक्सेसरीज बदलण्यात आल्या आहेत. कारच्या एक्सटेरिअरचं म्हणावं तर, यामध्ये ब्लॅक बपर्सवर गडद रंगाचं क्रोम एलिमेंट दिसतं. याशिवाय कारच्या केबिनमध्ये नवे काळ्या रंगाचे सीट कवर देण्यात आले आहेत. ज्यामुळं कारच्या बेज रंगावर ते कमाल दिसत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार कारच्या स्डँडर्ड व्हेरिएंटपेक्षा या पॅकेजसाठी साधारण 30000 रुपये जास्तीची किंमत मोजावी लागू शकते. 

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या कारच्या एडिशनमध्ये कोणताही मॅकेनिकल बदल करण्यात आलेला नाही. ज्यामुळं आधीप्रमाणेच कारला 1.5 लीटर थ्री सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आलं असून, त्यातून 75bhp पॉवर आणि 210 न्यूटन मीटर इतका टॉर्क जनरेट होतो. कारच्या इंजिनला मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स जोडण्यात आला असून, त्यामुळं रिअर व्हीलला पॉवर मिळते. 

कारच्या महत्त्वाच्या फिचर्सविषयी सांगावं तर त्यात डार्क क्रोम एक्सटीरिअर, स्पोर्ट ब्लॅक फ्रंट बंपर, प्रिमियम ब्लॅक इंटेरिअर, रुफ रेल (बोलेरो निओ), रिअर व्ह्यू कॅमेरा (बोलेरो निओ) देण्यात आला आहे. 

बोलेरो कार नव्हे, विश्वास! 

आता महिंद्राची कार म्हटली, की तिथं विश्वासार्हता आलीच आणि बोलेरोसुद्धा इथं अपवाद नाही. गेल्या 25 वर्षांपासून ही कार भारतात उत्तम कामगिरी करत असून, पॉवर आणि परफॉर्मन्समुळं भारताबाहेरही तिला चांगली मागणी आहे. भारतात फक्त शहरी भागच नव्हे, तर ग्रामीण भागातसुद्धा आणि विशेषत: ऑफरोडिंगसाठी बोलेरोला कारप्रेमींची निर्विवाद पसंती मिळते. 2000 मध्ये लाँच करण्यात आलेल्या या कारमध्ये मागील 25 वर्षांमध्ये अनेक बदल करण्यात आले. जून 2021  मध्ये या कारचं बोलेरो निओ हे प्रिमियम वर्जन लाँच झालं. राहिला प्रश्न किमतीचा तर, बोलेरोचं क्लासिक मॉडेल 9.79 लाख रुपयांना उपलब्ध आहे तर, बोलेरो निओसाठी 9.95 लाख रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळं किमतीसह परफॉर्मन्सच्या बाबतीत ही कार पैसा वसूल आहे, असंच अनेकजण म्हणत आहेत. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here