नांदेड प्रतिनिधी :- सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा दक्षिण विधानसभा प्रमुख बालाजी पाटील पुणेगावकर यांनी ॲपरेशन राजकीय रसाळी आयोजन करून केली रसाळी निमित्ताने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले असून राजकरणात गेल्या पन्नास वर्षांपासून कै.शंकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले असून जिल्ह्यात समाजकारण केले असल्याचे सांगून दोस्ती कायम केली असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बालाजी पाटील पुणेगावकर यांनी आयोजित रसाळी कार्यक्रम प्रसंगी केले.
सिडको येथील भाजपा दक्षिण विधानसभा प्रमुख बालाजी पाटील पुणेगावकर व सौ.आरती पुणेगावकर यांनी आयोजित कार्यक्रम प्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, नांदेड दक्षिण चे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, भाजपा महानगरध्यक्ष नांदेड अमरनाथ राजूरकर,एकनाथ पवार, संघटक मंत्री संजय कौडगे,जिल्हा अध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, ओबीसी सेल प्रदेश सचिव देविदास राठोड, एकनाथराव पवार,दता पाटील कोकाटे,तुलजेश यादव, माजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, भाजपा लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार, चैतन्य बापू देशमुख,बाळु खोमणे,कृऊबास नांदेडचे माजी सभापती संभाजी पाटील पुणेगावकर, डॉ.ऊनकेश्वर पवार , जनार्दन ठाकुर,यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महायुती साठी प्रामाणिक पणे काम केले आहे, जिल्हा यांच्या विकासासाठी काम केले असल्याचे सांगून जिल्हायात दुषीत राजकारण करण्याचे काम चालू असल्याचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी आगामी निवडणुकीचा दृष्टीने महायुती झाली पाहिजे असल्याचे सांगितले तर माजी आमदार अमरभाऊ राजुरकर,एकनाथ पवार,संतुक हंबर्डे यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणूक दृष्टीने महायुती होण्याबाबत व आगामी निवडणुका संदर्भाने मनोगत पर भाषणे केली.
प्रास्ताविक भाजपा नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख बालाजी पाटील पुणेगावकर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांच्ये स्वागत वैजनाथ देशमुख, बजरंग भेडेकर, योगेश पाटील नंदनवकर, माजी नगरसेवक संजय इंगेवाड,माजी नगरसेविका ललिता शिंदे, नगरसेवक प्रतिनिधी उदय देशमुख,भाजपा सिडको मंडळ अध्यक्ष सचिन रावका, मैड, राजु लांडगे,दलित मित्र नारायण कौलंबीकर, गजानन कहाळेकर,विकास कदम, सरपंच सिध्दार्थ तारू यांच्या सह मित्र परिवार यांनी केले आहे.तर सुत्रसंचलन शाहीर गौतम पवार यांनी केले.
नांदेड जिल्ह्यातील व विधानसभा मतदारसंघातील परिवाराशी संवाद साधण्यासाठी रसाळी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सरपंच, ऊपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.