विश्व पानसरे यांची बदली :
बुलढाणा,(प्रतिनिधी)-
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून निलेश तांबे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १३ ऑगस्ट २०२४ रोजी विश्व पानसरे यांची बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अवघ्या काही महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे.
निलेश तांबे हे २०१८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. नंदुरबार येथे त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर नागपूर येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांची कारकीर्द वाखाणण्याजोगी राहिली आहे. कृष्णप्रकाश प्रसाद यांच्यानंतर जिल्ह्याला पहिल्यांदाच भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी एसपी म्हणून मिळाले.