डिजिटल मिडीयाच्या  राज्यस्तरीय पुरस्काराने संजय कोठारी सन्मानित 

0

unnamed (2).jpg

जामखेड तालुका प्रतिनिधी 

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र महागौरव २०२५ राज्यस्तरीय पुरस्कार जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना प्रदान करण्यात आला. पुणे येथील जी डब्लू मॅरीट येथे डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना महागौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे अपघातातील जखमींना मदत करत आहेत ,उन्हाळ्यात पाणपोळ्या मुक्या जनावरांना चारा, वृद्धाश्रमातील वृद्धांना मदत, मूकबधिर विद्यालयातील मुलांना, देहदान नेत्रदान, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व्हा या पुस्तके वाटप, तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार, आत्तापर्यंत १४००० झाडे लावले आहेत, कोरोना काळात उल्लेखनीय काम केले,  बेवारस लोकांना मदत करतात तसेच बेवारस मृतदेहाचा अंतिम संस्कार करतात अशा अनेक सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे

 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे, विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप कुमार सपाटे,  सरीता कौशीक , राज्य समन्वयक इकबाल शेख,  अनिल कांकरिया, जैन संदेश मासिकाचे संपादक सुभाष लुंकड पुणे, रजत दायमा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब धोका,  नंदुसिंग परदेशी, मिठूलाल नवलाखा आदी उपस्थित होते 

यावेळी प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या लोगो चे प्रकाशन मंञी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here