कराडच्या निवृत्त जवानाची 1 कोटींची फसवणूक

0
IMG-20250605-WA0022.jpg

कराड : शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवत हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकार्‍याची सुमारे 1 कोटी 10 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधव मनोहर काळे (वय 61, रा. शुक्रवार पेठ, कराड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. किशोर अधिकराव पिसाळ (रा. करवडी, ता. कराड) व दीपक बाळकृष्ण यादव (रा. सोळशी, ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील माधव काळे हे हवाई दलातून सेवानिवृत्त झाले आहेत.

जानेवारी 2023 मध्ये त्यांची किशोर पिसाळ याच्याशी ओळख झाली. पिसाळ याने आपण सैन्य दलातून निवृत्त झाल्याचे सांगून विश्वास संपादन केला. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची संधी असल्याचे सांगून दिपक यादव याच्याशी माधव काळे यांची ओळख करून दिली. दिपक यादव यानेही मी सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी आहे, असे माधव काळे यांना सांगीतले. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला 4 टक्केप्रमाणे वर्षाला 48 टक्के परतावा देईन, असे अमिष दाखवले. त्यामुळे माधव काळे यांनी वेळोवेळी एकूण 1 कोटी 10 लाख रुपये दिपक यादव याच्या बँक खात्यात वर्ग केले.

प्रारंभी माधव काळे यांना संशयितांनी काही रक्कम दिली. मात्र, त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. संशय आल्यामुळे काळे यांनी सर्व पैसे परत मागितले. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक वागवे तपास करीत आहेत.

आणखी काही जणांची फसवणूक

संदेश चव्हाण (रा. मुंढे, ता. कराड) यांची 4 लाख आणि राजेंद्र पिसाळ (रा. करवडी, ता. कराड) यांची 1 लाख 90 हजारांची अशीच फसवणूक करण्यात आली असल्याचे माधव काळे यांना समजले असून अन्य काही लोकांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त होत असून, याबाबतची सत्यता पोलिस पडताळत आहेत 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here