मंत्री गोरे खंडणी प्रकरण प्रभाकर देशमुख यांची सात तास चौकशी

0

IMG-20250605-WA0040.jpg

वडूज : मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणीप्रकरणी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना वडूज पोलिसांनी समन्स बजावले होते. अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर प्रभाकर देशमुख सोमवारी सकाळी वडूज पोलिस ठाण्यात हजर झाले.
पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी देशमुख यांची तब्बल सात तास चौकशी करून त्यांचा जबाब घेतला.

मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणात यापूर्वी पत्रकार तुषार खरात, महिला व शिंदेसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार यांना अटक होऊन सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रभाकर देशमुख यांना समन्स बजावण्यात आला होता. तो मिळताच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

त्यानंतर देशमुख दोन दिवसांपूर्वी जबाब देण्यासाठी हजर झाले होते. मात्र, तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सोनवणे उपलब्ध नसल्याने त्या दिवशी त्यांचा जबाब होऊ शकला नाही. सोमवारी (दि. २) सकाळी वडूज पोलिस ठाण्यात येऊन देशमुख यांनी जबाब नोंदविला.
यावेळी देशमुख समर्थक शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी होती.

यापूर्वी माजी आमदार प्रभाकर घार्गे, विधानपरिषेदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी जबाब नोंदविले आहेत. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे संशयित आरोपी यांच्याशी संभाषण अथवा आर्थिक देवाण-घेवाण, व्हाॅटसॲप मेसेज आणि एकत्रित बैठक होऊन काही चर्चा झाली आहे का ? या अनुषंगाने प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

तिघांच्या जामिनावर आज निर्णय

मंत्री गोरे यांच्याकडे मागितलेल्या खंडणीप्रकरणी अटकेत असलेले अनिल सुभेदार यांचा नियमित जामीन मिळणेबाबत तर प्रभाकर घार्गे व अनिल देसाई यांचा अटकपूर्व अंतरिम जामीनसाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सातारा या ठिकाणी सुनावणी होणार आहे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here