Can India win even without Rohit and Virat Captain Shubman makes a big statement on India tour of England | India tour of England: रोहित आणि विराटशिवायही भारत जिंकू शकेल? कर्णधार शुभमनने केले मोठे विधान

0

[ad_1]

Shubman Gill Take On Rohit Sharma & Virat Kohli’s Absence: भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा तरुण सलामीवीर शुभमन गिलच्या खांद्यावर देण्यात आली आहे. 20 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेपूर्वी रोहित शर्मा व विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने भारतीय संघाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. या नवीन अध्यायाआधी पत्रकार परिषद झाली. यामध्ये शुभमन गिलने पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत एक वेगळाच कॉन्फिडन्स दाखवला. 

रोहित-विराट निवृत्त, गिलकडे कर्णधारपद

साधारण महिनाभर आधी रोहित शर्माने सोशल मीडियावरून आपल्या कसोटी निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्या काही दिवसांनी विराट कोहलीनेही तेच केले. अशा वेळी प्रश्न उभा राहिला की आता भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार? त्याचवेळी बीसीसीआयने शुभमन गिलवर मोठी जबाबदारी दिली. मात्र, गिलनं या जबाबदारीला एक संधी मानली आहे.

हे ही वाचा: 35 कोटींचा तोटा अन् त्या दिवशी 350 कोटींची कमाई… प्रीती झिंटा झाली मालामाल

 

“प्रत्येक दौऱ्यावर प्रेशर असतोच. रोहित आणि विराट यांचं अनुभव मोठा आहे, त्यांनी अनेक वेळा भारतासाठी सामने जिंकले. त्यांच्या जागा भरून काढणं अवघड आहे. पण हे काही वेगळं प्रेशर नाही. आम्ही सगळे खेळाडू अशा परिस्थितींसाठी तयार असतो,” असं गिलनं पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं.

कर्णधार म्हणून गिलची तयारी 

कसोटी क्रिकेटमध्ये गिल हा भारताचा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. आपल्या लीडरशिपबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी कोणत्याही विशिष्ट शैलीला फॉलो करणार नाही. माझं लक्ष्य खेळाडूंशी बोलणे आणि त्यांना सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करणं हे आहे. जेव्हा खेळाडू सुरक्षित वाटतात, तेव्हाच ते आपलं शंभर टक्के देतात.”

हे ही वाचा : ” त्याच्या शरीराचे तुकडे…” चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या मुलाच्या बापाने फोडला टाहो

WTC सायकलसाठी पहिली मालिका

इंग्लंडविरुद्ध ही मालिका भारतासाठी नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) सायकलमधील पहिली मोठी कसोटी असेल. बीसीसीआयने या मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे.

हे ही वाचा: Axar Patel Retirement: “माझा क्रिकेटचा प्रवास इथपर्यंतच…” अक्षर पटेलने घेतली निवृत्ती? रिटायरमेंटचा Video Viral

भारताचा इंग्लंड दौऱ्यासाठी संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु इस्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here