विजेचा शॉक लागून बापलेकाच्या मृत्यू प्रकरणी वायरमनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

0

जामखेड तालुका प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथे शेतामध्ये काम करीत असताना तुटलेल्या तारांना स्पर्श होऊन काकासाहेब शिकारे व महेश शिकारे या दोघा बापलेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवत विज वितरण कंपनीच्या कर्मचारी वायरमन शितल हुलगुंडेवर खर्डा पोलीस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बाळगव्हाण येथे दि. २३ जून २०२५ रोजी सदर घटनेतील मयत काकासाहेब शिकारे (वय ४४) व त्यांचा दहावीत शिकत असलेला मुलगा मुलगा महेश शिकारे (वय १५) वर्षे हे दोघे बापलेक शेतामध्ये खते टाकत असताना तुटलेला वीजतारांना चिटकून विजेचा शॉक बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या भागात कर्तव्यावर असलेले वायरमन शितल मधुकर हुलगुंडे यांनी बाळगव्हाण शिवारातील विजेच्या इलेक्ट्रिक तारा तुटल्याने वीज कनेक्शन बंद न केल्यास कोणाचाही जीव जाऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा व सदरच्या तुटलेल्या तारा त्यांना सांगूनही त्यांनी काही एक दुरुस्ती केली नाही.

तसेच तारांमधील वीज प्रवाह (करंट) बंद केला नाही. सबब कामात हलगर्जीपणा केल्यामुळे सदरच्या तुटलेल्या तारांना स्पर्श होऊन  शिकारे पिता-पुत्रांचा मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत इंद्रराज सदाशिव शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस स्टेशनला विज कर्मचारी शितल हुलगुंडेवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here