वर पक्षातील पाच ते सहा तरुण लग्नमंडपातून थेट रुग्णालयात…
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपुर रोड लगत असलेल्या दत्त लॉन्स येथे आज रविवारी विवाह समारंभात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.वधू पक्षातील काही तरुणांनी वर पक्षातील तरुणांची येथेच्छा धुलाई करीत पाच ते सहा तरुणांना लग्नमंडपातून थेट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. वरपक्ष आणि वधू पक्षातील तरुणांत किरकोळ कारणातून जोरदार हाणामारी झाली.या कारणाने वर पक्षातील चार ते पाच तरुणांना लग्न मंडपातून थेट रूग्णालयात दाखल करावे लागले आहे.
राहुरी तालुक्यातील एका गावातील लग्न समारंभ राहुरी फॅक्टरी येथिल दत्त लाँन्स येथे आयोजित करण्यात आला होता.या लग्न समारंभात नगरहून वऱ्हाडी आले होते.या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होती.ठरल्याप्रमाणे रविवारी लग्न सोहळा पार पडला.मात्र यावेळी वधू पक्षातील तरुण आणि वर पक्षातील काही तरुण यांच्यात वाद झाला.सुरूवातीला हा वाद किरकोळ होता.पण नंतर या वादाचं रूपांतर हाणामाऱ्यात झाले.
लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरहून आलेल्या वऱ्हाडातील तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली.त्यामुळे हा वाद चिघळला.हा वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचं रूप आलं. शाब्दिक बाचाबाची थेट हाणामारी होईपर्यंत पुढे गेली.वधू पक्षातील तरुणांनी वर पक्षातील काही तरुणांना लग्न मंडपातून थेट रुग्णालयात दाखल करे पर्यंत मारहाण केली.वर पक्षातील चार ते पाच जणांवर राहुरी फँक्टरी येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.