सातारा : मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दिक्षा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार – २०२५ चा बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत रसाळ यांच्या हस्ते राजर्षी शाहू स्मारक, कोल्हापूर येथे सन्मानीत करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,छ. शाहूंची प्रतिमा व पुस्तके असे होते.
राजर्षी शाहूंच्या समतावादी नगरीतील नावाजलेल्या मानाच्या व सन्मानाच्या पुरस्कारासाठी सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय आदी क्षेत्रातील उल्लेखनीय असे दखलपात्र कार्य पाहता हक्काचे मानकरी म्हणून पुरस्कारासाठी निवड समितीने एकमताने निवड केली होती.हा मानाचा पुरस्कार असल्याचे मान्यवरांनी विशद केले.ट्रस्टतर्फे अंतिमा कोल्हापूरकर,प्रमुख अमर कांबळे आदींनी स्वागत केले. प्रा.शोभा चाळके यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी “राजर्षी शाहू महाराजांना समजून घेताना…” या विषयावर जाहीर व्याख्यान देताना भरत रसाळे म्हणाले,”छ. शाहूंनी मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले होते.मिळालेले २८ वर्षे जनतेसाठी त्यांनी खर्ची केले.राज्यात शिक्षण पद्धतीचा बोजवारा होत आहे.२० पटसंख्येनुसार शाळा बंद पाडण्याचा कुटील डाव आहे. पॅकेज पद्धत सुरू झाली आहे.ते बंद केले पाहिजे. शासनाचा छुपा अजेंडा नष्ट केला पाहिजे. शिक्षणाचा खर्च ६ टक्के इतका झाला पाहिजे.सामाजिक भान राखुन सर्वसामान्यांसाठी लढा उभारला पाहिजे.अलिकडे चळवळीची क्षमता कमी होत चालली आहे.तेव्हा पुरोगामी महाराष्ट्रात वेगळे करणाऱ्यास छेद दिला पाहिजे. लोकशाहिचा खरा-खुरा राजा राजर्षी होऊन गेले.बंधुत्व,पुरोगामी व संविधानाचा विचार जोपासला पाहिजे.” प्राचार्य डॉ.प्रशांकुमार कांबळे यांनी पुरस्कार हा व्यक्तीचा नसून कार्याचा गौरव आहे.यावेळी किसनराव कुऱ्हाडे, अनिल म्हमाणे यांच्यासह पुरस्कार विजेत्यांची मनोगत व्यक्त केली.
यावेळी डॉ. श्रीपाद देसाई, प्राचार्य किसनराव कुऱ्हाडे, ऍड.करुणा विमल, विश्वासराव तरटे,भरत लाटकर, डॉ.श्रीपाद देसाई, जीवनगौरव पुरस्कार विजेते डॉ. प्रशांतकुमार कांबळे, दादासाहेब कांबळे आदी मान्यवरांसह शाहुप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते. अध्यक्षस्थानी अनिल म्हमाने (प्रकाशक व दिग्दर्शक) होते. निवेदकाचे काम अर्हंत मिणचेकर यांनी काम पाहीले. वैभव अरिहहंत यांनी सूत्रसंचालन केले.याकामी निमंत्रक विश्वासराव तरटे व अंतिमा कोल्हापूरकर यांनी अथक असे परिश्रम घेतले.